शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

गणेशपुरी पोलीस ठाण्याला हक्काचा ठाणेदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:34 AM

वज्रेश्वरी दरोडा प्रकरण : मंदिरात खाजगी सुरक्षारक्षक नेमले नाही

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी मंदिरातील दरोड्यानंतर ते मंदीर ज्या गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे, त्या पोलीस ठाण्याला गेल्या काही दिवसांपासून हक्काचा ठाणेदार मिळालेला नाही. यामुळे त्या पोलीस ठाण्याच्या कारभार सद्यस्थितीत दुसऱ्या पोलीस ठाण्यातील एका अधिकाºयाच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यातच वज्रेश्वरी मंदीर प्रशासनाने पोलिसांनी सुचवल्याप्रमाणे अद्यापही खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली नसल्याने ग्रामीण पोलीसच मंदीर परिसरात पहारा देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१० मे रोजी वज्रेश्वरी मंदीरातील सुरक्षारक्षकाला बांधून दरोडा टाकण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांच्याकडून दरोड्यातील बºयापैकी मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यातच कारवाईनंतर पत्रकार परिषदेत ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी मंदिरात पुन्हा दरोडा किंवा चोरीच्या घटना घडणार नाहीत, यासाठी मंदीर प्रशासनाला खाजगी सुरक्षारक्षक नेमण्यास सांगून पोलिसांद्वारे पहारा ठेवणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे पोलीस यंत्रणेमार्फत मंदीर परिसरात ग्रस्त वाढवला आहे. मात्र, मंदीर प्रशासनाने अद्यापही सुरक्षारक्षक नेमले नाहीत. याचदरम्यान, गणेशपुरी पोलीस ठाण्याचा कारभार असलेले सहायक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे यांच्यावर एका जुन्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ते वैद्यकीय सुटीवर गेले आहेत. त्यानंतर गणेशपुरी पोलीस ठाण्याचा कारभार भिंवडी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज घाटकर यांच्याकडे अतिरिक्त भार सोपवला आहे.लोंढे यांच्यावरील कारवाई प्रकरणी चौकशी होणे बाकी आहे. अधिकाऱ्यांच्याही बदल्या अपेक्षित असल्याने त्या पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कारभार एका अधिकाºयाकडे सोपवला आहे.मंदीर प्रशासनाने अद्यापही खाजगी सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली नाही. त्याबाबत त्यांना लवकरच पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच पोलीस मुख्यालय आणि स्थानिक पोलीस ठाण्यामार्फत चोवीस तासांसाठी दोन पोलिसांद्वारे पहारा दिला जात आहे. तर गणेशपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लोंढे हे वैद्यकीय सुटीवर आहेत. त्यामुळे गणेशपुरी पोलीस ठाण्याचा कारभार सहायक पोलीस निरीक्षक घाटकर यांच्याकडे दिला आहे.- डॉ. शिवाजी घाटकर , पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस