शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

ठाणे, भिवंडी परिसरात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद

By जितेंद्र कालेकर | Published: June 06, 2024 5:47 PM

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्याच्या डायघर आणि भिवंडी परिसरातील घरांमध्ये चोऱ्या करणाऱ्या अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ दारा (२५, रा. रांजनोली, भिवंडी) याच्यासह पाच जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी दिली. या टोळीकडून ४३ मोबाईलसह सोन्याचे दागिने असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना ७ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अलिकडेच झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपासाची सूत्रे हलविण्यात आली होती. डायघर भागात चोरी करणारा राजदूत उर्फ इम्रान शेख उर्फ सागर (२६, रा. भिवंडी) याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ३ मे २०२४ रोजी ताब्यात घेतले होते. डायघर भागात नोव्हेंबर २०२३ मध्ये एका घरातून चोरलेल्या चार मोबाईलची त्याने कबूली दिली. हे ४० हजारांचे मोबाईलही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. याच गुन्हयाच्या समांतर तपासामध्ये आरोपी सागर याच्याकडील चौकशीमध्ये अन्य ठिकाणी चोरी करणारे अख्तर हुसेन गुलाम मुर्तुजा खान उर्फ वारा , मोहमद शमशुद्दीन (१९) मोहमद अन्सारी (२६) आणि मोहमंद खान (२८) या चौघांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी आणि उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ यांच्या पथकाने २ जून २०२४ रोजी अटक केली.

त्यांच्याविरुद्ध डायघर पोलिस ठाण्यात चोरीसह हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपी मोहमद खान याच्याकडून एक लाख पाच हजारांचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सहा लाख ९४ हजारांचे ४३ मोबाईल आणि तीन हजार सहाशेची रोकड असा ऐवज हस्तगत केला. तपासात डायघरमधील तीन गुन्हे आणि मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्याचा एक असे चार गुन्हे उघडडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, ४३ मोबाईल, स्कूटर आणि ष्घरफोडीसाठी वापरलेली सामुग्री असा आठ लाख ८३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आराेपींपैकी अख्तर खान याच्याविरुद्ध डायघरमध्ये दाेन तर िभवंडीत सहा असे आठ चाेरीचे गुन्हे दाखल आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी