कसारा : पाणी टंचाईग्रस्त शहापूर तालुक्यातील गावांना भेट देण्यासाठी मंगळवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी या गावांचा दौरा केला. यात शिंदे यांनी वैयक्तिक खर्चातून पाण्याच्या टाक्या देत ग्रामस्थांची तहान भागवली. तालुक्यातील पेंढरघोळ, कानविंदे, डोंगरपाडा, अजनुप, दापूर माळ, यासह चिंतामण वाडी, ओहळाचीवाडी, गांगडवाडी परिसराला त्यांनी भेट दिली.
दौºयादरम्यान अतिदुर्गम दापूर माळ या गावातही दौरा केला. स्वातंत्र्य काळापासून या अतिदुर्गम भागात जिल्हा परिषद सदस्य देखील कधी फिरकला नव्हता. त्या दापूर गावात तब्बल तासाभराचा प्रवास करत शिंदे पोहोचले आणि दापुºयातील परिस्थिती जाणून घेतली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तेथेच तात्काळ जलपरी तसेच पाइपलाइन टाकून घेतली. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंद आहे. ही योजना सौरऊर्जेवर आधारित केल्याने पाणी तसेच वीज बिलाचा प्रश्नच नाही.
दापूरपासून तीन किमी. अंतरावरील सावरखेड गावात शासनाच्या कोणत्याही योजना पोहोचल्याच नसल्याचे ग्रामस्थांनी मंत्र्यांना सांगितल्यावर शिंदे यांनी महाराष्ट्र विज वितरण कंपनीचे अभियंता तसेच वनविभाग, महसूल यंत्रणा यांना आदेश देत वीजेचा आणि पाण्याचा विषय निकाली काढला. पालकमंत्र्यांच्या या कार्यतत्परतेमुळे दापूर ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. पालकमंत्री धावून आल्याने आमचा प्रश्न निकाली निघाल्याचे विजय शिंगवा यांनी सांगितले. या दौºयात जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जि.प.अध्यक्षा मंजुषा जाधव तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते.
गायधराचे थकीत बिल भरलेदरम्यान, अजनुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वरचा गायधरा या गावात पाणी योजना आहे. मात्र, वीज कट केल्याने योजना बंद होती. याची गंभीर दखल घेत तत्काळ शिंदे यांनी ४० हजार रुपये देण्याचे कबूल करत सहा दिवसांत गायधरा पाणी योजना सुरू करण्याचे आदेश दिले. या निर्णयाने तेथील ग्रामस्थांनीही आनंद व्यक्त केला.
दोन लाखांची मदतशिरोळ फाटा येथे दोन दिवसांपूर्वी जयराम धापटे आणि पप्पू धापटे या तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. त्या धापटे कुटुंबाची पालकमंत्री शिंदे यांनी भेट घेतली. तसेच मृत तरुणांच्या कुटुंबाला शिवसेनेच्या वतीने दोन लाख रुपयांची मदत केली.