ठाणे : आंध्रप्रदेशातील गांजाची थेट मुंबईमध्ये तस्करी करण्यासाठी आलेल्या अमोल राजू हिरवे (२१, रा. इंदिरानगर, तुर्भेनाका, नवी मुंबई) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्याच्याकडून नऊ लाखांचा २८ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.शीळफाटा परिसरातील फेमस हॉटेलच्या समोरील रस्त्यावर एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी त्याच्या मोटारसायकलवरून येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. त्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार आणि उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार आणि वालझडे यांच्या पथकाने २७ जानेवारी रोजी रात्री ९.४० वा. च्या सुमारास अमोल हिरवे याला फेमस हॉटेलच्या समोर दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये दोन प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये १४ चौकोनी गठ्ठे आढळले. त्यामध्ये आठ लाख ५५ हजारांचा २८ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा तसेच ४० हजारांची मोटारसायकल, दहा हजारांचा मोबाईल, एक हजार तीनशे रुपयांची रोकड असा नऊ लाख सहा हजार ३०० रुपयांचा ऐवज या पथकाने जप्त केला. कला शाखेतून १४ वी पर्यंतचे त्याने शिक्षण घेतले असून गेल्या काही दिवसांपासून तो गांजाच्या तस्करीचे काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने हा गांजा आंध्रप्रदेशातून आणला असून तो त्याची विक्री ठाणे मुंबईमध्ये विकण्याच्या तयारीत होता. त्याला २८ जानेवारी रोजी पहाटे २ वा. च्या सुमारास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याला दहा दिवस (६ जानेवारी २०१९) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याची आणखी किती जणांची टोळी आहे? तो हा गांजा नेमकी कोणाला देणार होता? या सर्व बाबींची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शीळ डायघर भागातून गांजा तस्करास अटक: नऊ लाखांचा २८ किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:30 PM
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने २८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अमोल हिरवे (२१) यालाअटक केली. त्याच्याकडून नऊ लाखांचा २८ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
ठळक मुद्देआंध्रप्रदेशातील गांजाची मुंबईत विक्री ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाईडायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल