भाग्यश्री प्रधान, ठाणे आपला रास गरबा सरस व्हावा, यासाठी मोबाइल अॅपचा वापर होताना दिसत आहे. सेल्फ लर्निंग गरबा, दांडिया रास, गुजराती गरबा, अशा काही अॅप्सची सध्या तरुणांमध्ये चलती आहे. या प्रत्येक अॅपमध्ये दांडिया आणि गरब्याची वेगवेगळी विभागणी केल्याने हे सर्वच अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्याचे प्रमाण वाढले आहे. या अॅपमुळे आपल्याला हवी तशी स्टेप शिकता येईल. यामध्ये विविध स्टेप्स असल्याने बच्चे कंपनीपासून ते वृद्धापर्यंत सारेच त्या शिकून घेण्यासाठी उत्सुक दिसत आहेत.दांडियांमध्ये मोठ्या दांडीपासून ते छोट्या दांडीपर्यंत ती हातात कशी धरावी तसेच ती कशी फिरवावी, याचेही धडे व्हिडीओद्वारे प्रात्यक्षिके दाखवून अॅपमध्ये दिले आहेत. गरबा गीते, बॉलिवूडची हिट गाणी तसेच गुजराती गीते, वेस्टर्न साँग गरबा आदी सर्वच गाण्यांवर ताल कसा धरावा, याबाबत हे अॅप्स माहिती देतात. वीकेंडला गरबा जोरदार असल्याने सध्या याला भलताच डिमांड आहे.
मोबाइल अॅपवर आता गरबाही
By admin | Published: October 16, 2015 1:44 AM