मीरा रोड : उत्तन येथील धावगी येथील कचºयाचा डोंगर १४ जुलै रोजी रात्री लगतच्या आठ घरांवर कोसळून नुकसान झाल्याने ठेकेदारावर कारवाई करा आणि नुकसान भरपाई द्या, अशी मागणी रहिवासी व स्थानिक नगरसेविकेने करूनदेखील पालिका ठेकेदारास पाठिशी घालत आहे.
मीरा भाईंदर शहरातील कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पालिकेला घनकचरा प्रकल्पासाठी उत्तनच्या धावगी डोंगरावरील सरकारी जमीन मोफत दिली आहे. महापालिकेने प्रक्रिया न करताच तेथे मोठ्या प्रमाणात बेकायदा कचरा डंपिंग केल्याने येथे कचºयाचे डोंगर उभे झाले आहेत. या ठिकाणी येणारा कचरा योग्य आकारात साठवण्यासाठी पालिकेने ठेका दिला आहे. परंतु जुलै महिन्याच्या १४ तारखेला रात्री सतत कोसळणाºया पावसामुळे कचºयाचा डोंगर लगतच्या आठ घरांवर कोसळला. कचºयासह पाणी जास्त प्रमाणात वाहून आले. कचºयाचा डोंगर पडत असल्याचे समजताच आठ घरातील सुमारे २० जणांनी जीवाच्या भीतीने घराबाहेर पळ काढला. रहिवाशी वेळीच बाहेर पडले म्हणून बचावले, पण कचरा व पाण्याचा प्रवाह वेगाने खाली आल्याने घरांचे व आतील सामानाचे नुकसान झाले. यात काही घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. कचºयाचा डोंगर कोसळून मोठी दुर्घटना घडूनही महापालिका ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. ठेकेदाराने कचºयाचे डोंगर उभे करताना पावसात ते कोसळण्याची शक्यता पडताळून पहिली नाही व खबरदारी घेतली नाही. वर्षानुवर्षे त्याच ठेकेदाराला कचरा सपाटीकरणाचे काम करण्याकरिता मुदतवाढ दिली जात आहे. या ठेकेदारास काळ््या यादीत टाकण्याची मागणी होत आहे.कचरा घरावर कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराचे कंत्राट रद्द करावे व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी. ज्या लोकांच्या घरांचे व सामानाचे नुकसान झाले, ते ठेकेदाराने भरून द्यावे. - शर्मिला गंडोली, नगरसेविका, शिवसेनाकचरा कोसळण्याच्या घटनेबाबत ठेकेदारास नोटीस बजावण्यास संबंधित स्वच्छता निरीक्षकांना सांगितले आहे. -दीपक खांबित, कार्यकारी अभियंता, मीरा-भार्इंदर महापालिका