शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
4
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
5
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
6
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
7
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
8
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
9
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
10
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
11
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
12
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
13
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
14
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
15
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
16
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
17
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती
18
प्रचारासाठी मिळणार अवघे १४ दिवस; मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह उमेदवारांची धावपळ
19
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या गाड्यांतून हाेत आहे कचरा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:01 PM

कोट्यवधींची बिले : कंत्राटदाराविरुद्ध तक्रारी असूनही कार्यवाही शून्य

धीरज परबमीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील  कचरा व अंतर्गत गटार सफाईचे काम हे १ मे २०१२ रोजी मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला पाच वर्षांसाठी दिले होते. त्यामुळे त्याची मुदत एप्रिल २०१७ मध्ये संपल्यानंतर पावणेचार वर्षांपासून मुदतवाढ देत आहे. मुंबई महापालिकेने अपात्र ठरवलेल्या या कंत्राटदाराविरुद्ध अनेक तक्रारी व आरोप होऊनही कार्यवाही होत नाही.

त्याच्यामार्फत कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक गाड्या या जुन्या, नादुरुस्त तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या आहेत. तरीही याच गाड्या चालवून कोट्यवधीची बिले दिली जातात.  या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा असल्याचा पालिकेचा दावाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. गाड्या या पालिकेच्या की कंत्राटदाराच्या हितासाठी चालवल्या जातात, असा प्रश्न निर्माण होतो .

सुका, ओला, औद्याेगिक  कचऱ्यावर होणारी प्रक्रिया नाममात्र 

उत्तनच्या धावगी डोंगरावर सरकारी जागेत घनकचरा प्रकल्प उभारला आहे. तेथे सुका, ओल्या व औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत व सुक्या कचऱ्यापासून जळाऊ इंधन तयार केले जाते, असे पालिकेचे म्हणणे आहे. 

टॅग्स :thaneठाणे