शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

माथेरानमधील मोकळ्या जागांवर बनणार उद्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:04 AM

शहरातील बहुतांश प्रभागातील जागा रिक्त आहे. या जागांवर अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेने अशा मोकळ्या जागेत उद्याने बनविण्यासाठी पुढाकार घेतला

माथेरान : शहरातील बहुतांश प्रभागातील जागा रिक्त आहे. या जागांवर अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी नगरपरिषदेने अशा मोकळ्या जागेत उद्याने बनविण्यासाठी पुढाकार घेतला असून अनेक प्रभागात अशा प्रकारच्या कामांना सध्या गती मिळत आहे. क्षणभर विश्रांतीसाठी हक्काची जागा उपलब्ध झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.मागील काळात काही लोकप्रतिनिधींनी मतांच्या राजकारणापायी अनेक रिक्त जागांवर कचराकुंड्या बसविल्या होत्या. त्या कचराकुंड्या अल्पावधीतच तुटून त्या जागेत कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. बहुतांश भागात काही नागरिकांनी अतिक्रमणे केली होती. त्यामुळे नगरपरिषदेच्या जागेचा गैरवापर केला जात असल्याने त्या जागांवर सध्या उद्याने बनविण्यासाठी नगरपरिषदेने पावले उचलली आहेत. सर्वच प्रभागात अशा प्रकारे उद्याने बनविण्यात येणार असून माथेरानच्या सृष्टीसौंदर्यात भर पडणार आहे.प्रभाग स्वच्छ, सुशोभित दिसणार आहे. पंचवटी नगर भागात प्रथमत: नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जुन्या स्टॅण्डपोस्टची जागा रिक्त झाल्यावर त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये यासाठी छोटेसे उद्यान बनविले होते. त्याच धर्तीवर इंदिरा नगर भागात सुद्धा नागरिकांना आणि पर्यटकांना क्षणभर विश्रांतीसाठी उद्यान बनविण्यात येत आहे. नगरपरिषदेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत गटनेते प्रसाद सावंत यांच्या पुढाकाराने होत असलेल्या सकारात्मक कामांबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.