मोठा गाजावाजा करून श्रेय घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी मात्र बंद केलेल्या घरगुती गॅसच्या सबसिडीविरोधात आवाज उचलला नाही. या गॅसच्या एकूण किमतीवर दरमहा ६० ते ७० रुपये बँक खात्यात सबसिडी म्हणून जमा होत असत. पण, वर्षभरापासून ही रक्कम दिली जात नाही. उलट दरमहा २५ ते ३० रुपये सिलिंडरच्या किमतीवर वाढ करून अन्याय केला जात आहे.
३) छोटे सिलिंडरचे दर जैसे थे -
छोट्या पाच लीटरच्या सिलिंडरचे भाव अवघ्या आठ महिन्यांत फक्त एक महिन्यापूर्वी वाढले. ३०० रुपयांना मिळणारा सिलिंडर आता ४२० रुपयांना मिळत आहे. याच्या किमती मात्र सतत वाढविलेल्या नसल्याचे आढळले आहे.
--------------
४) व्यावसायिक सिलिंडर तीन रुपयांनी स्वस्त -
हॉटेल, कॅन्टिन व्यावसायिकांना दिला जाणारा सिलिंडर सध्या एक हजार ५८० रुपयांस मिळत आहे. त्यात तीन रुपये कमी झाल्याचे ऐकायला मिळत आहे. पण, या व्यावसायिकांचा कानोसा घेतला असता त्यांना या तीन रुपयांची सूट मिळत नसल्याचे बोलले जात आहे.
-----------------------
* आता चुली कशा पेटवायच्या?
१) प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाईने आता महिन्याचे संपूर्ण बजेटच कोलमडले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे महिन्याला जवळपास दोन हजार रुपये केवळ इंधनावर खर्च होत आहेत. मागील सात-आठ वर्षांचा विचार केल्यास ४०० ते ४५० दरम्यान मिळणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. आता पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याचा प्रसंग ओढवला आहे. या महागाईत घर कसे चालवावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ गॅसच नव्हेतर, गहू, बाजरी, तांदूळ हे जर वगळले तर तेल, साबणासह जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत ५० ते ७० टक्के वाढ झाली असून, जगायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा आहे.
.....
लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्या तर अनेक कंपन्यांनी वेतनात कपात केली आहे आणि दुसरीकडे महागाईचा भस्मासूर या दोन्हींच्या कोंडीत सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. अफगाणमधील अराजकतेमुळे या महागाईत आणखी तेल ओतले जाईल, अशी शक्यता आहे. सरकारने निदान गॅसच्या किमती कमी करून दिलासा द्यावा.
- विजया पाटील, मुरबाड
-------------
२) गॅसच्या वाढलेल्या किमतीमुळे जवळपास हजार, दोन हजारांच्या आसपास पैसे जर निव्वळ स्वयंपाक गॅसवर खर्च होत असतील तर सर्वसामान्यांनी जगायचे कसे? महिन्याला सरासरी दोन गॅस सिलिंडर लागतात. हा खर्च अनिवार्य आहे. इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. उत्पन्न मर्यादित आणि खर्च वाढता यामुळे प्रचंड आर्थिक ओढाताण होत आहे. गॅस वापरण्याची सवय झाली आहे. आता चूल कशी पेटवायची? ही समस्या आहेच.
- वनिता घोलप, टोकावडे
----------