उल्हासनगर : घरगुती गॅस सिलिंडर मधून गॅसची चोरी करुन ते कमर्शियल वापराच्या सिलिंडरमध्ये भरुन देणाºया ५ डिलिव्हरी बॉयच्या टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्यांच्याकडून हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या तब्बल ८३ गॅस सिलिंडरसह २ टेम्पो, गॅस चोरी करण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना ३१ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.उल्हासनगरात घरगुती गॅस सिलिंडरचे वजन कमी असल्याची व गॅस सिलिंडर लवकर संपत असल्याची चर्चा सुरू होती. त्याचवेळी घरगुती गॅस सिलिंडर मधील गॅस चोरी करणारी टोळी गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केली. शहरातील सी ब्लॉक परिसरातील रेड्डी कम्पांऊडमध्ये घरगुती गॅस सिलिंडर मधून गॅस चोरी करून कमर्शियल सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना मिळाली. विभागाच्या पथकाने बुधवारी सापळा रचून धाड टाकली. यावेळी आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.शहर गुन्हे अन्वषण विभागाने विलास अण्णा शेळके, सुखदेव नागनाथ जाधव, सोमनाथ नागनाथ जाधव, सुनील नानासाहेब सूर्यवंशी व रामदेव निर्माही यादव या पाचजणांना अटक केली. हे सारे एचपी गॅस कंपनीचे सिलिंडर घरपोच करणारे डिलिव्हरी बॉय आहेत.
घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:15 AM