शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
3
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
4
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
5
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
6
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
7
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
9
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
11
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
12
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
13
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
14
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
15
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
16
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
17
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
18
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
19
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
20
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."

ठामपाच्या निष्काळजीपणामुळे महानगरची गॅसलाइन फुटली: सुदैवाने हानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 11:24 PM

ठाणे महापालिकेच्या वतीने मलनि:सारण वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरु असतांनाच नितिन कंपनीजवळ महानगरची गॅस वाहिनी फुटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. सुदैवाने ही वाहिनी तातडीने जोडण्यात आल्याने याठिकाणी जिवित हानी टळल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे३० सोसायट्यांमधील ६०० कुटुंबीयांना बसला फटकानितीन कंपनीजवळील घटना

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनीदरम्यान असलेल्या सेवारस्त्यावरील महानगर गॅस कंपनीची वाहिनी फुटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ठाणे अग्निशमन दल आणि महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धावपळ करत दोन तासांमध्ये हा गॅसपुरवठा पूर्ववत केला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.नितीन कंपनी ते कॅडबरी कंपनीच्या मार्गावरील मुंबईकडे जाणा-या सेवारस्त्यावर दर्यासागर हॉटेलच्या समोरच ठाणे महापालिकेच्या वतीने मलनि:सारणवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. याच ठिकाणी महानगर गॅस कंपनीची भूमिगत वाहिनी गेलेली आहे. महानगरची कोणतीही परवानगी न घेता ठामपाच्या ठेकेदाराने रविवारी आपले काम सुरूच ठेवले होते. यात सकाळी ११.३० वा.च्या सुमारास जेसीबीचा फटका बसल्याने ही वाहिनी अचानक फुटली. गॅसगळती सुरू झाल्यानंतर याठिकाणी काम करणाºया कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि या घटनास्थळासमोरील बाजूला असलेल्या ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी तातडीने धाव घेतली. महानगर गॅसच्या अधिकाºयांना याबाबतची माहिती त्यांनी प्रभारी अधिकारी नितीन पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारी १.३० पर्यंत हा गॅसपुरवठा पूर्ववत केला. साधारण, २५ ते ३० सोसायट्यांमधील ६०० कुटुंबीयांना या गॅसगळतीचा फटका बसला होता. 

कोणतीही परवानगी न घेता ठामपाच्या ठेकेदाराने याठिकाणी खड्डा खोदण्याचे काम केले. ही घटना समजताच माती टाकून व्हॉल्व्ह बंद केले. त्यानंतर, तातडीने दुरुस्तीचे काम केले.नितीन पेडणेकर, ठाणे जिल्हाप्रमुख, महानगर गॅस कंपनी

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिका