शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

ठाण्यातील गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयात गॅस गळती; सुदैवाने जीवितहानी टळली

By जितेंद्र कालेकर | Published: October 15, 2023 3:29 PM

गॅस ऑपरेटरच्या प्रसंगावधानाने वेळीच गळती नियंत्रणात, या ऑक्सिजन  गळतीचा उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणताही त्रास झालेला नाही.

ठाणे: वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या आवारातील ३९० किलो वजनी आॅक्सिजन गॅस सिलिंडरमधून मोठया प्रमाणात गळती झाल्याची घटना रविवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास  समोर आली. गॅस गळतीमुळे रुग्णालयासह आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींच्या नावाने असलेल्या या किसननगरमधील विवियन होंडा शोरुमजवळील रुग्णालयात झालेल्या या ऑक्सिजन  गळतीचा उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना कोणताही त्रास झालेला नाही. दाब वाढल्यामुळे सेफ्टी वॉल बेंड होऊन ऑक्सिजन गॅस गळती झाली.  अवघ्या काही तासांमध्येच परिस्थिती नियंत्रणात आल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.  वागळे इस्टेटमधील किसननगर नंबर ३, भटवाडी येथे शनिवारी सायंकाळी घरगुती गॅस सिलिंडर होऊन आग लागली होती. त्यामध्ये दोघे जखमी झाले असतानाच  काही तासांमध्येच श्रीनगर येथे रुग्णालयाच्या आवारातील ऑक्सिजन गॅस सिलिंडर रूम मधील एसएसडी गॅसेस प्रा.लि. कंपनीचा ३९० किलो वजनी ऑक्सिजन गॅसचा प्रेशन वाढल्यामुळे सिलिंडरमधून रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. याची माहिती मिळताच घटनास्थळी रुग्णालयामधील ऑक्सिजन गॅस ऑपरेटर, सुरक्षारक्षक, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.

रुग्णालयामधील ऑक्सिजन गॅस सिलिंडर ऑपरेटर यांनी सिलिंडरचा प्रेशर नियंत्रणात आणून ऑक्सिजन गॅस गळती पूर्णपणे थांबवली.  त्यातच ऑक्सिजन गॅस रूम मध्ये आणखी  एक ३९० किलो वजनी ऑक्सिजन सिलेंडर असल्यामुळे त्या रुग्णालयामधील ऑक्सीजन गॅस पुरवठा मात्र सुरळीत सुरु होता.  दरम्यान या रुग्णालयामधील रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.तसेच सुरक्षेच्या कारणास्तव रुग्णालयातील प्रशासक आणि सुरक्षा रक्षक यांना त्या एसएसडी गॅसेस प्रा. लि. या कंपनीचे असलेले ऑक्सिजन गॅस सिलिंडरची कंपनीकडून देखभाल करून घेण्यास सांगण्यात आल्याची माहितीही आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.