-----
जिल्ह्यात उज्ज्वला गॅसची ६० हजार २८३ कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. मात्र, यापैकी संपूर्ण जिल्हाभरात ४४ हजार १५२ कनेक्शनचे आतापर्यंत लक्ष्य गाठण्यात आले आहे. या योजनेपासून अनेक कुटुंबे वंचित राहिली होती. दुसरा टप्पा सुरू झालेला असला तरी सप्टेंबर २०१९ पासून मोफत कनेक्शन व शेगडीचे वाटप बंद केलेले आहे. आतापर्यंत सिलिंडरच महागलेले असल्याने या योजनेच्या लाभार्थ्यांनी सिलिंडर खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने या योजनेचे भवितव्यच संकटात सापडले आहे.
----------
* उज्ज्वला गॅस कनेक्शन लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया ---
* आम्ही मजुरी करणारी माणसे आहोत. एकदम सातशे, आठशे रुपये गॅस सिलिंडरच्या टाकीसाठी खर्च करणे आम्हाला शक्य नाही. त्यामुळे आता आम्ही तिचा वापर करणे बंद केले आहे.
- दत्ता मुकणे, भातसानगर
---------------
गॅसच्या वाढीव किमतीवर सर्वांनाच २५ ते ६० रुपयांपर्यंत सबसिडीची रक्कम बँकेत जमा होत असे. परंतु, आता गॅस सबसिडी अनुदान रक्कमही एक वर्षापासून बंद झाली आहे. मजुरी वेळेवर मिळत नाही. मजुरीही अल्प आहे. त्यातून सिलिंडर विकत घेता येत नाही. जंगलात लाकडे सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सिलिंडर वापरणे बंद केले आहे.
- यशवंत हिलम, शहापूर
---------
चार वर्षांपूर्वी पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडर देण्यात आले. मात्र, सिलिंडर घेणे परवडत नसल्याने ते बंद केले आहे. सध्या लाकडे जाळून चुलीवर स्वयंपाक सुरू केला आहे.
- दिलीप जाधव, बिरवाडी, शहापूर
-----------------
जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन - ४४,१५२
----------
* जिल्ह्यातील गॅस सिलिंडरचे दर-
१) जानेवारी २०१९ - ७०४.५० रु.
२) जानेवारी २०२० - ७१४ रु.
३) जानेवारी २०२१ - ६९४ रु.
४) ऑगस्ट २०२१ - ८३५ रुपये
-------------