ठाणे : गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी गजलमध्ये सच्च माणूस घडविण्याची ताकद आहे अशा भावना गजलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केल्या.
ते म्हणाले की, आम्ही सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा वसा घेतला आहे. गजलकार संतोष यांच्यामधला गजलकार गजलनेच घडवला असल्याच ते म्हणाले. 9 व्या अ. भा. मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष मधुसुदन नानीवडेकर म्हणाले की, दु:खाला शरण सर्वच जण जातात पण त्याच दु:खाला सलाम करण्याची हिमत फक्त संतोष यांच्यात आहे. दु:खाला सलाम करायला कवीमन लागत असते असे सांगत त्यांनी त्यांचे कौतुक केले. महापालिका उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, वेदनेमुळे जगणं समृद्ध नव्हे तर समृद्धदार होते. दु:खाला सलाम करण्यासाठी समज असावी लागते. दु:खाला सलाम करीत नाही तोर्पयत दु:खाला भिडण्याचे बळ प्राप्त होत नाही. दु:खाला सलाम करण्याचे धारिष्टय़ संतोष यांच्या गजलांमधून वाचायला मिळेल असे ते म्हणाले. मी गजल, कवितांमधूनच घडलो अशा भावना खास लंडनहून आलेले अॅड. रविंद्र लगाडे यांनी व्यक्त केल्या. त्यानंतर संतोष व त्यांच्या आई यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. सोहळ्य़ानंतर ज्येष्ठ गजलकार ए.के. शेख यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित गजलकारांचा मुशायरा पेश झाला. ‘मोगरा फुलतो सकाळी, सोस थोडी कळ जरा’ या विशाल राजगुरूंनी सादर केलेल्या या गजलने मुशायराची सुरूवात झाली. त्यानंतर राजेंद्र वैशंपायन यांनी ‘खोल जखमा माङया उरी, पण थेंब नेत्रीचा गळेना..’, पत्रकार माधव डोळे यांनी ‘ही मंद तेवते वात कधीची आत, ती प्रसन्न दु:खे पावन गाभा:यात’, ‘तूर पिकवली खूप, मिळेना भावच साला, फक्त आमचे शेतकरी नाच साला’, उपायुक्त माळवी यांनी ‘तु खुले आकाश माङो, तू नवा विश्वास माझा’, ‘मी शोध सुखाचा घ्याया, आयुष्य गमावून बसलो’, डी.एन. गांगला यांनी ‘कसे कसे मज धडे मिळाले, हि:याऐवजी खडे मिळाले’, संतोष शजर यांनी ‘माणूस होण्यापेक्षा मी जर पक्षी बनलो असतो, मंदिर, मस्जीद, गिरीजाघर कोठेही बसलो असतो’, नानीवडेकर यांनी ‘तुङयाकडे मागावे काही ही तर माझी हिंमत नाही, समजून काही द्यावे घ्यावे तेवढी तुझी दानत नाही’ तर शेख यांनी ‘सुखाबरोबर दु:खाचा सत्कार करुया, असे सहज आयुष्याचे अलवार करुया’ या गजल सादर झाल्या. यावेळी अधून मधून वाह वाह, क्या बात, बहुत बढीयाची दाद मिळाली. कार्यक्रमाचे निवेदन रवि मानकर यांनी केले.