ठाणे : ठाणे महापालिकेतील लोकप्रतिधिी विरुद्ध आयुक्त वाद आता अधिकच पेटला आहे. शहराच्या ्रप्रथम नागरिक महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून त्यांना सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचे निर्देश देऊन लोकप्रतिनिधींच्या घटनादत्त अधिकारांच्या होत असलेल्या पायमल्लीकडे लक्ष वेधले आहे.
देशात ज्याप्रमाणे संसद आणि राज्यात विधिमंडळ या सर्वोच्च सार्वभौम संस्था आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेत महापालिकेची सर्वसाधारण सभा ही त्या शहराची सर्वोच्च सार्वभौम संस्था असून तिला ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल हे जुमानत नसून लोकप्रतिनिधींच्या घटनादत्त अधिकारांची पायपल्ली करून त्यांना चोर ठरविण्याचा संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात महापौरांनी केला आहे. ते स्वत:ही सर्वसाधारण सभेत उपस्थित राहत असून अधिकाऱ्यांनाही सभागृहाबाहेर घेऊन जात असल्याने शहरविकासाचे निर्णय घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत.लोकप्रतिनिधींना त्रास देण्याचा प्रयत्नलोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासंदर्भात प्रश्न विचारल्यास त्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांना उलटसुलट प्रश्न विचारून त्यांची वैयक्तिकरित्या चौकशी लावून त्रास देत असल्याचे ही महापौरानी म्हटले आहे.अविश्वास ठरावाचे पत्र आमदारांनीच दिले लिहूनच्पालिका आयुक्तांनी अविश्वास ठराव आणण्यासंदर्भातील जे गोपनीय पत्र पाठवले आहे ते आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच लिहून दिले असल्याचा खळबळजनक आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. एखाद्या आमदारांकडून अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची नामुष्की पालिका आयुक्तांवर येते यापेक्षा वाईट गोष्ट दुसरी नसून आमदारांनीदेखील जाणतेची कामे करायची सोडून अशाप्रकारे आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांना पत्र लिहून देतात.च्ज्या काँग्रेसने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आधी अविश्वास ठराव आणण्यासाठी मागणी केली आणि नंतर आयुक्तांना पाठिंबा दिला, वास्तविक एक महिला महापौर असताना अशा प्रकारे पुरु षार्थ या मंडळीनी दाखवायला हवा होता तो दाखवला नाही. त्यामुळे ज्या बांगड्या माङया हातात आहेत त्या त्यांच्या हातात असायला पाहिजे होत्या असा टोला महापौरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना लगावला आहे. महापौरांच्या या आरोपांमुळे आता हा संघर्ष आता आणखी गडद झाला झाला आहे.विकासकामे रखडलीच्आयुक्तांच्या या भूमिकेमुळे ठाणे शहराच्या विकासावर विपरीत परिणाम होत असून, अनेक कामे खोळंबली आहेत.च्यासाठी पावसाळयात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविणे, झोपडपट्टीमधील शौचालयांच्या दुरु स्तीची कामे, महापालिका शाळांची दुरवस्था इत्यादी अनेक प्रश्न मार्गी लावणेस विलंब होत आहे.च्आयुक्तांची ही भूमिका २० लाख ठाणेकरांवर अन्याय करणारी असून त्यांच्या हितासाठी आयुक्तांना आपण सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याचे निर्देश द्यावेत, असे महापौर शिंदे यांनी मुख्यमंंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.राष्ट्रीय ध्वजारोहणाला दांडीमहापौर म्हणून रु जू झाल्यानंतर गेल्या अडीच वर्षाच्या काळात १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाचा एक कार्यक्र म वगळता प्रशासन प्रमुख आयुक्त हे ४ कार्यक्र मांना अनुपिस्थत होते, हा महापौरांचा अवमान नसून तो राष्ट्रध्वजाचा अवमान आहे, याकडे महापौरांनी लक्ष वेधले आहे.