शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

भाजपच्या ठिय्या आंदोलनानंतरही महासभा सुरूच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 1:33 AM

गोंधळात झाले विषय मंजूर : सदस्यांचा सभात्याग, महासभा रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वेबिनारद्वारे होणारी महासभा रद्द करावी, या मागणीसाठी शुक्रवारी भाजपच्या नगरसेवकांनी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठिय्या आंदोलन केले. परंतु, तरीदेखील महासभा सुरूच राहिल्याने भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कृतीचा निषेध करून चुकीचे विषय मंजूर करण्यासाठीच ही वेबिनार महासभा घेतल्याचा आरोप केला. या संदर्भात प्रशासनाने वेबिनार महासभा का घेतली जात आहे, याचा खुलासाही केला. परंतु, तरीही भाजपच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही. अखेर महासभा सुरूच राहिल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

शुक्रवारच्या महासभेत दुस-या टप्प्यातील क्लस्टर योजनेच्या सहा आराखड्यांना मंजुरी देणे, चुकीच्या पद्धतीने मेट्रोच्या ठेकेदाराला विनामोबदला जागा वापरण्यासाठी देणे, सायकलस्टॅण्डचा जाहिरातीसाठीचा चुकीच्या पद्धतीने आणलेला प्रस्ताव असे काही प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी पटलावर होते. या विषयांसह इतर विषयांवर चर्चा व्हावी, या मागणीसाठी भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांना पत्र देऊन ही सभा रद्द करून प्रत्यक्ष सभा घ्यावी, अशी मागणी केली. परंतु, तरीदेखील शुक्रवारी महासभा सुरू झाली. त्यामुळे वेबिनार महासभा रद्द करून प्रत्यक्ष घेण्यासाठी भाजपच्या नगरसेवकांनी बल्लाळ सभागृहात ठिय्या आंदोलन केले. 

दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी भाजपने जी मागणी केली आहे, तीच मागणी राष्ट्रवादीनेदेखील केली असून, महासभा प्रत्यक्ष स्वरूपात का घेतली जात नाही, याचे उत्तर प्रशासनाकडे मागितले. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनीही महासभा प्रत्यक्ष व्हावी, यासाठी प्रशासनाला सांगण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार आता नेमकी काय परिस्थिती आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, असे आदेश त्यांनी दिले.

राज्य सरकारकडे केला पत्रव्यवहारप्रशासनाच्या वतीने सचिव अशोक बुरपुल्ले यांनी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु, त्यांच्याकडून अद्यापही उत्तर न आल्याने ही सभा वेबिनारद्वारे घेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या या उत्तरानंतरही भाजपच्या नगरसेवकांचे समाधान झाले नाही.