उल्हासनगर : अवैध बांधकामे व शौचालय टाकीत पडून ५ वर्षांच्या मुलाच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाच्या नगरसेवकांनी आक्रमक होऊन महासभेत आंदोलन केले. त्यात, शिवसेना एकाकी पडल्याचे दिसले. अवैध बांधकाम प्रकरणी प्रशासनाने माफी मागावी, असे सांगून नगरसेवकांनी एकच गोंधळ घातला. अखेर, महापौर अपेक्षा पाटील यांनी गोंधळातच महासभा अनिश्चित काळासाठी स्थगित केली.आयुक्त मनोहर हिरे यांनी अवैध बांधकामांवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात धडक पाडकाम कारवाई सुरू केली असून १० दिवसांत २५ पेक्षा जास्त बांधकामे जमीनदोस्त केली. नगरसेवकांनी यात हस्तक्षेप केल्यास त्यांचे पद रद्द करण्याच्या परिपत्रकाने नगरसेवकांची मने दुखली असून याचा रोष या महासभेत उमटला. ठेकेदार, पालिका अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाला असून ५ लाखांच्या मदतीची मागणी केली. आयुक्त हिरे यांनी याची दखल घेऊन त्वरित मदतीचे आश्वासन दिले. तर आयुक्तांना कोंडीत पकडणाऱ्या भाजपा नगरसेवकांना शह देण्यासाठी सेना नगरसेवकांनी आयुक्तांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.
उल्हासनगर महासभेत सेना पडली एकाकी
By admin | Published: October 15, 2015 1:43 AM