शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
2
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
3
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
4
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
5
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
6
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
7
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
8
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
9
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
10
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
11
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
12
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
13
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
14
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
15
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
16
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
17
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
18
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
19
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट

ठाण्यात क्लस्टरचा फायदा मिळविण्यासाठी वृद्धेचे सामान दुकानातून रस्त्यावर टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:03 PM

क्लस्टर योजना लागू झाल्याने दुकान मालक नारायण डायरे यांची मुले सुरेश आणि गुलाब यांनी वत्सला पडवळ यांच्या दुकानाचे टाळे तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामान रस्त्यावर टाकल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमालकाचा खटाटोप असल्याचा आरोपवागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार४० वर्षांपासून पागडीवर घेतले होते दुकान

ठाणे : तब्बल ४० वर्षे पागडीवर घेतलेल्या किराणा मालाच्या दुकानाचे टाळे तोडून एका ८५ वर्षीय वृद्धेचे सामान रस्त्यावर टाकून दुकानावर कब्जा केल्याचा प्रकार हाजुरी गावात २२ मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी थेट अपर पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर संबंंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वत्सला वामन पडवळ (८५), रा. नारायण डायरे चाळ, हाजुरी गाव, ठाणे येथे ५ मार्च १९७९ रोजी ५०० रुपये अनामत रक्कम आणि महिना ६० रुपये भाडेतत्त्वावर पागडीवर १० बाय १० चौरस फुटांचा गाळा पडवळ दाम्पत्याने डायरे यांच्याकडून घेतला. त्याठिकाणी त्यांनी किराणा दुकान सुरू केले. दरम्यान, १८ वर्षांपूर्वी वामन पडवळ यांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर वत्सला यांनी दुकान चालू ठेवले. ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी हे दुकान चालवले. ठाण्यात क्लस्टर योजना लागू झाल्याने मूळ मालक नारायण डायरे यांची मुले सुरेश आणि गुलाब डायरे यांनी २२ मार्च २०१८ रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान वत्सला यांच्या दुकानाचे टाळे तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सामान रस्त्यावर टाकले. दुकानातील रोकड घेऊन दस्तऐवजही चोरले. दुकानावर कब्जा करून डायरे बंधूने दुकानाला टाळे लावले. वत्सला पडवळ यांच्या दुकानाचा १९७९ चा गुमास्ता परवाना तसेच १९८२ या वर्षाची भाडेपावती यात गायब करण्यात आले. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून न घेतल्याने वत्सला यांनी ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांची भेट घेऊन ही कैफियत मांडली. त्यानंतर, वागळे इस्टेट पोलिसांनी २३ मार्च रोजी गुलाब डायरे आणि त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. ठाण्यात क्लस्टर योजना लागू झाल्याने भविष्यात चांगले दुकान मिळेल, म्हणून त्यापूर्वीच आपले दुकान दडपशाहीने खाली करून बेरोजगार केले. आता आपले उदरनिर्वाहाचे साधन परत मिळवून द्यावे, अशी मागणी त्यांनी पोलीस यंत्रणेकडे केली आहे.

‘‘वत्सला पडवळ यांची तक्रार त्याच दिवशी नोंदवून घेतली आहे. ज्यांच्याविरुद्ध ही तक्रार आहे, तेही वृद्ध आहेत. त्यामुळे दोघांची बाजू समजून यामध्ये चौकशी करण्यात येत आहे.’’रवींद्र मालेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वागळे इस्टेट पोलीस ठाणे.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPoliceपोलिस