शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

क्लस्टरचा विलंब ‘धोकादायक’च्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:20 AM

घाटकोपर येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १७ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने ठाण्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाणे : घाटकोपर येथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तब्बल १७ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याने ठाण्यातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या इमारतींकरिता क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू करण्यात आली असली, तरी या योजनेतील पहिला टप्पाच पूर्ण करण्यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने शहरातील धोकादायक इमारतींत राहणाºया सुमारे साडेपाच लाख रहिवाशांचा जीव टांगणीला लागण्याची चिन्हे आहेत.ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला ‘सी वन’ म्हणजे अतिधोकादायक ६८ इमारती असून यातील ५५ इमारती रिकाम्या करून पाडण्यात आल्या आहेत. शिल्लक १३ इमारतींपैकी ८ इमारतींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. उरलेल्या पाच इमारतींवर कारवाई सुरू असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. याखेरीज, ३ हजार ६९३ इमारती धोकादायक स्थितीत असून त्यांची दुरुस्ती अद्याप झालेली नाही. मागील वर्षी क्लस्टर योजना मंजूर झाली. योजनेतील अडथळे अलीकडेच दूर झाले. परंतु, प्रत्यक्षात ही योजना केव्हा राबवली जाणार, हे मात्र अद्यापही सांगता येणे कठीण आहे.८ हजार चौरस मीटरपर्यंतच्या क्षेत्रफळात एकत्रितपणे सामूहिक विकास करायचा आहे. शहराचे मुंब्रा, कळवा, किसननगर आणि वागळे असे चार भाग केले जाणार असून टप्प्याटप्प्याने ही योजना राबवली जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यात या चारपैकी कोणत्या परिसराचा क्रमांक लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वागळे अथवा किसननगर परिसराचा विचार केल्यास या भागातील इमारती अतिशय दाटीवाटीने उभ्या असून त्या ठिकाणी चारपेक्षाही अधिक एफएसआय आधीच वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे येथे योजनेतील प्रस्तावित चार एफएसआयदेखील कमी पडणार आहे. ज्या भागात सामूहिक विकास योजना राबवली जाणार आहे, त्या जमिनी कोणाच्या आहेत, जागामालक कोण आहे, आरक्षणे कशी व कोणत्या स्वरूपाची आहेत, शासकीय किंवा खाजगी जागा आहे का? सध्या अस्तित्वात असलेल्यांपैकी अधिकृत व अनधिकृत इमारतींची संख्या किती, त्या इमारतींमधील रहिवाशांच्या मागण्या कोणत्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अगोदर शोधावी लागणार आहेत.नव्या क्लस्टर योजनेनुसार मूलभूत सुविधा पुरवणे क्रमप्राप्त होणार आहे. जागांच्या मालकीवरून कोर्टाची पायरी चढण्याचा धोका आहे. या व अशा अडथळ्यांची शर्यत पार करण्यासाठी सुमारे अडीच ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी भीती पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली. वास्तव असे असले तरी योजनेचा प्राथमिक टप्पा सुरू होण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असा आशावाद पालिकेने व्यक्त केला.ठामपाने तब्बल ६ हजार ६३० कोटींचा स्मार्ट सिटी आराखडा केंद्र सरकारला सादर केला आहे. यामध्ये चार हजार कोटी हे क्लस्टर योजनेसाठी प्रस्तावित केले आहेत. संपूर्ण खाजगी लोक सहभागातून (पीपीपी) क्लस्टर योजना राबवण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या आराखड्यात घेण्यात आला आहे.शहरातील ३ हजार ६९३ धोकादायक इमारतींमध्ये ५ हजार ८९३ कुटुंबे वास्तव्य करीत असून १८ हजार रहिवासी राहत आहेत.