शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

मालमत्तेच्या व्यवहारात घाटकोपरच्या व्यावसायिकाची ३.५0 लाखांनी फसवणूक, ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 9:27 PM

ठाणे :दुसर्‍याची मालमत्ता विकण्याच्या नावाखाली घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला.

ठळक मुद्देजमिन मालकाच्या बनावट सह्याराबोडी ठाण्यात गुन्हा दाखलआरोपीविरूद्ध आणखी एक फसवणुकीचा गुन्हा

ठाणे : जमिन विकण्याच्या नावाखाली मालकाच्या बनावट सह्या करून घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची ३ लाख ५0 हजार रुपयांनी फसवणूक करणार्‍या भिवंडी येथील एका आरोपीविरूद्ध राबोडी पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला.घाटकोपर येथील डॉक्टर चाळीत राहणारे सुरज रामलखन गुप्ता यांना २0११ साली जमिन विकत घ्यायची होती. हा विषय त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितला. या मित्राने पडघा येथील तळवली येथील अमजद अन्सार गोरे याच्याशी गुप्ता यांची भेट घालून दिली. अमजदने तळवली येथील एक जमिन विकायची असल्याचे सांगितले. या जागेची सर्व कागदपत्रे त्याने गुप्ता यांना दाखवली. या जागेचा व्यवहार ८ लाख ५0 हजार रुपयांमध्ये निश्चित झाला. इसाराची रक्कम म्हणून ३ लाख ५0 हजार रुपये गुप्ता यांनी दिले. उर्वरित ५ लाख रुपये खरेदीच्या वेळी देण्याचे ठरले. इसाराची रक्कम घेताना अमजदने मुळ जमीन मालकाच्या बनावट सह्या केल्या. साठेकरारामध्येही मालकाची खोटी सही केली. खरेदीसाठी पाच लाख रुपयांची जुळवाजुळव झाल्यानंतर गुप्ता यांनी अमजदशी संपर्क साधला असता, त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. गुप्ता यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन चौकशी केली असता अशा प्रकारच्या कोणत्याही व्यवहाराची तिथे नोंदच झाली नसल्याचे उघडकीस आले. गुप्ता यांनी अमजदला ३ लाख ५0 हजार रुपये परत मागितले असता, त्याने शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. गुप्ता यांनी याप्रकरणी राबोडी पोलिसांकडे याप्रकरणी रविवारी तक्रार दिली. त्यानुसार अमजद अन्सार गोरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. अमजद याने अशा प्रकारे फसवणूक केल्याची तक्रार यापूर्वीही एकदा दाखल झाली असल्याचे तपास अधिकारी सुजित गडदे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसMumbaiमुंबई