शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

घोडबंदर-बोरिवली सर्वाधिक अवैध वाहतूक, २० प्रवासी कोंबून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 2:58 AM

शहरातील घोडबंदर-बोरिवली या मार्गावर खासगी बसगाड्यांमार्फत प्रवाशांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बिनधास्त कोंबून खासगी वाहनांकडून बेकायदा वाहतूक सुरू आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : शहरातील घोडबंदर-बोरिवली या मार्गावर खासगी बसगाड्यांमार्फत प्रवाशांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बिनधास्त कोंबून खासगी वाहनांकडून बेकायदा वाहतूक सुरू आहे. ब-याचदा यामुळे अपघात होऊन जीवितहानी होत आहे.ठाणे पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातून मुलुंडच्या दिशेने, तर तीनहातनाका आणि सिडको बसस्थानक भागातून खाजगी बसगाड्या अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. बोरिवली-घोडबंदर मार्गावर सुमारे ५० बसद्वारे अवैध वाहतूक सुरू असल्याचे एका पाहणीत आढळले आहेत. मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या या अवैध प्रवासी वाहतुकीचा टीएमटी, एनएमटी, बेस्ट आदी परिवहन सेवांना फटका बसत आहे.याखेरीज, कल्याण-मुरबाड महामार्गावर मुरबाड तालुक्यातील सुमारे ७०० जीप अवैध प्रवासी वाहतूक करतात, असे निदर्शनास आले आहे. मुरबाड-बदलापूर, म्हसा-धसई, मुरबाड-म्हसा, शेवगाव-टोकावडे, मुरबाड-शहापूर आदी मार्गांवर या जीप मनमानी पद्धतीने जास्त प्रवासी कोंबून वाहतूक करत आहेत. महिनाकाठी केवळ ५०० रुपयांच्या कृपाशीर्वादावर हा जीवघेणा प्रवास सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.सहा प्रवासी अधिक एक ड्रायव्हर असा अधिकृत परवाना असलेल्या जीपगाड्यांमध्ये कमीतकमी, १३ तर जास्तीतजास्त २० प्रवासी बिनदिक्कत कोंबण्यात येतात, असे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जाते. या अवैध वाहनांतील प्रवासी एसटी महामंडळाकडे वळवण्याकरिता एक स्वतंत्र जीप प्रत्येक तालुक्यात फिरते. त्यामध्ये एक आरटीओ अधिकाºयासह एसटीचा अधिकारी व इन्स्पेक्टरची असतात. मात्र, अवैध प्रवाशांना आळा घालणे, त्यांना फारसे शक्य झालेले नाही.>एसटी महामंडळाची कबुलीकल्याण-भिवंडी, मुरबाड-अंबरनाथसह शहापुरातील डोळखांब, टिटवाळा, शहापूर, अनगाव, वासिंद, कसारा आणि नाशिकपर्यंत हजारो प्रवासी अवैध वाहनांतून किंवा मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून प्रवास करत असल्याचे एसटी महामंडळाच्या ठाणे कार्यालयाने कबूल केले.