शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

घोडबंदरला मिळणार वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी, महापालिकेने केला स्टेमकडे पत्रव्यवहार

By अजित मांडके | Published: February 02, 2024 4:07 PM

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

ठाणे :  घोडबंदरच्या पाण्याच्या मुद्यावरुन मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा रान पेटले आहे. येथील नागरीकांना पाण्याच्या समस्या मांडल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी देखील वाढीव पाण्याची मागणी केली होती. अखेर ठाणे महापालिकेने घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. हे वाढीव पाणी मिळण्यास एक महिन्यांचा कालावधी जाणार असल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले. परंतु हे वाढीव पाच दशलक्ष लीटर पाणी घोडबंदरला पुरेसे ठरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु असे असले तरी आजही ठाण्यातील अनेक भागांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात घोडबंदर भागाला तर याची झळ अधिक बसत आहे. या भागाला कमी पाणी पुरवठा होत असल्याने त्याचा फायदा टँकर माफीया घेत आहेत. त्यामुळे अनेक सोसायटींना टँकरचेच बिल महिनाकाठी ४ ते ५ लाख जात आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या पाण्या संदर्भातील पहिल्या बैठकीत घोडबंदरचा पाणी प्रश्न चांगलाच पेटल्याचे दिसून आले. घोडबंदरला पाणी वाढविण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी घोडबंदरला वाढीव १० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा वाढवून मिळावा अशी मागणी केली आहे. तर स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी या भागाला १०० एमएलडी पाणी दिले तरी कमी पडणार असल्याची भुमिका विषद केली आहे. त्यात आता माजी खासदार संजीव नाईक यांनी याच मुद्यावरुन महापालिका आयुक्तांची भेट घेत वाढीव पाण्याची मागणी केली आहे.

घोडबंदर भागाची लोकसंख्या सद्यस्थितीला ५ ते ७ लाखांच्या वर गेली आहे. या भागाला सध्या प्रतीदिन ११० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु तो देखील अपुरा पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिकेने या भागाला वाढीव ५ दशलक्ष लीटर मिळावे यासाठी स्टेम प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापूर्वी देखील महापालिकेने वाढीव पाण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. परंतु त्याला फारसा यश आलेले दिसून आले नाही. परंतु आता महिनाभरात घोडबंदरला वाढीव ५ दशलक्ष लीटर पाणी मिळेल असे दावा पालिकेने केला आहे. परंतु पुढील महिन्यापासून उन्हाळा उजाडणार असल्याने पाणी टंचाईचे ढग आणखी तीव्र होणार आहेत. त्यामुळे हा वाढीव पाणी पुरवठा घोडबंदरकरांना मिळाला नाही तर मात्र त्यांचे आणखी हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे