शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

मुलीनेच चक्क आईला अडकवले शरीरविक्रयाच्या व्यवसायात, पोलिसांनी केली दोघींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 8:45 PM

पैशांचे आमिष दाखवून अन्य कोणी नाही, तर पोटच्या मुलीनेच जन्मदात्या आईला शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे : पैशांचे आमिष दाखवून अन्य कोणी नाही, तर पोटच्या मुलीनेच जन्मदात्या आईला शरीरविक्रयाच्या व्यवसायात अडकवल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. यात त्या आईसह दोन पीडित महिलांची ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने विष्णुनगर पोलिसांच्या सहकार्याने मंगळवारी सुटका केली. यातील मुलीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.एरव्ही, आईवडिलांनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पोटच्या मुलाला किंवा मुलीला विकल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. डोंबिवलीत मात्र हेमा करोतिया (२३) या दलाल तरुणीने चक्क आपल्याच आईला शरीर विक्रयाच्या व्यवसायात अडकविले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. याबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे दौंडकर यांच्यासह उपनिरीक्षक कल्याणी पाटील, जमादार राजू महाले, पोलीस नाईक अंकिता मिसाळ, निशा कारंडे तसेच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे जमादार पी. बी. परुळेकर, नाईक एस. जी. थोरात, ए.आर. गोगरकर, एस. पी. माने आणि पी.के. सावंत आदींच्या पथकाने मंगळवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील ‘रायगड’ इमारतीमधील ‘हॉटेल विहार प्युअर व्हेज रिफ्रेशमेंट लंच होम’ या हॉटेलमध्ये छापा टाकला. त्यानंतर दलाल तरुणीची ४६ वर्षीय आई तसेच त्यांच्या शेजारी राहणारी २५ वर्षीय तरुणी अशा दोघींची सुटका केली. याप्रकरणी हेमाविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. तिने यात आणखी किती मुलींना अडकविले, तिचे यात आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.आर्थिक परिस्थितीचा गैरफायदायातील अन्य २५ वर्षीय पिडीत तरुणीचा सांभाळ केवळ आईने केला. तिच्या लहानपणीच वडील निघून गेले. तिच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हेमाने तिला या व्यवसायात अडकवले. एका कामात चांगले पैसे मिळतील, असे सांगून तिने नंतर चक्क आईलाही यात अडकवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाल्यावर छापा टाकणाºया पथकालाही धक्का बसला. कहर म्हणजे पुन्हा मुलीनेही यात आईवरच उलटसुलट आरोप करून आपण कसे निर्दोष आहोत, असा कांगावा पोलिसांसमोर केला.दोन हजारांत ‘सौदा’फोनद्वारे शरीरविक्रयासाठी मुली उपलब्ध असल्याचे हेमा ग्राहकांना सांगायची. त्यातून फोनवरूनच एका वेळी एका मुलीसाठी दोन हजारांचा ती सौदा करून त्यातील एक हजार रुपये स्वत:कडे ठेवून उर्वरित पैसे संबंधित मुलीला देत असे. आधी इतर मुलींना नंतर आपल्याच आईला तिने यात गोवले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बनावट ग्राहक पाठवून आईसह तिच्या शेजारणीचीही सुटका केली.

 

टॅग्स :Crimeगुन्हा