शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

जिल्ह्यात मुलींची बाजी

By admin | Published: May 27, 2015 10:53 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे.

अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे. यात रायगड जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के लागला असून सर्वच तालुक्यांत मुलींनी बाजी मारली आहे. पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल ४७.०५ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील अलिबाग, पनवेल, मुरुड, माणगांव, श्रीवर्धन, म्हसळा आणि महाड या सात तालुक्यांचा निकाल ९० टक्केपेक्षा अधिक तर उरण, कर्जत, सुधागड, पेण, रोहा, तळा व पोलादपूर तालुक्याचा निकाल ८० टक्केपेक्षा अधिक लागला आहे. केवळ खालापूर तालुका काहीसा पिछाडीवर गेला असून या तालुक्याचा निकाल ७६.९२ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील बारावीसाठी १४ हजार ९५३ मुले तर १३ हजार ५३८ मुली असे एकूण २८ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १२ हजार ९४५ मुले तर १२ हजार ७९९ मुली असे एकूण २५ हजार ७४४ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच ८६.५७ टक्के मुले तर ९४.५४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून संपूर्ण जिल्ह्याचा निकाल ९०.३६ टक्के आहे. जिल्ह्यात २ हजार ४३८ विद्यार्थी पुनर्परीक्षार्थी होते. त्यापैकी १ हजार १४७ उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ४७.०५ टक्के आहे.विज्ञान शाखा निकालात प्रथम क्रमांकावर असून या शाखेचा निकाल ९४.३१ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील एकूण २८ हजार ४९१ परीक्षार्थींमध्ये विज्ञान शाखेचे ९ हजार ५८४ परीक्षार्थी होते. त्यापैकी ४३४ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २ हजार ३५९ प्रथम, ५ हजार ७०१ द्वितीय तर ५४५ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ९ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५० टक्के लागला असून एकूण ९ हजार ६९९ परीक्षार्थींपैकी ६८६ विशेष गुणवत्ता श्रेणीत, ३ हजार २२१ प्रथम, ४ हजार ५८८ व्दितीय तर ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ८ हजार ९७२ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उच्च व्यवसाय अभ्यास (व्होकेशनल) शाखा निकालात तृतीय क्रमांकावर असून ८८.९५ टक्के निकाल लागला आहे. या शाखेचे ८६९ परीक्षार्थी होते, पैकी २२ विशेष गुणवत्ता श्रेणीत, २४८ प्रथम, ४८७ व्दितीय, १६ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ७७३ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेचा निकाल ८३.४६ टक्के लागला आहे. या शाखेत एकूण ८ हजार ३३९ परीक्षार्थी होते, पैकी ११९ विशेष गुणवत्ता श्रेणीत, १ हजार ६८४ प्रथम, ४ हजार ३८७ द्वितीय, ४७७ उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ६ हजार ९६० परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (विशेष प्रतिनिधी)नागोठणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. येथील कोएसोच्या कै. सरेमल प्रतापमल जैन उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ८१.४९ टक्के लागला. कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखेचे परीक्षेस बसलेले ३६२ पैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नागोठणे एज्युकेशन सोसायटीच्या उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निकाल ७३ टक्के इतका लागला असून ४३ पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून शिमना अक्र म अन्सारी (प्रथम), झैबा अनिस अधिकारी (द्वितीय)आणि रफत हमीद चोरडेकर (तृतीय) तर वाणिज्य शाखेतून मोईन महमद चोगले (प्रथम), असद सलीम शिंदी (द्वितीय), माज मिर्झा पठाण (तृतीय) असे क्र मांक मिळविले. येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी.परमार इंग्लिश स्कूलचा निकाल ६४ टक्के लागला असून २८ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत आकांक्षा चौधरी (प्रथम), कौशल पटेल (द्वितीय) आले आहेत. कोकण एज्युकेशन सोसायटीचा निकाल ९३.२४ टक्केकोकणातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या कोकण एज्युकेशन सोयायटीचा निकाल ९३.२४ टक्के लागला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय दत्ता पाटील यांनी दिली. संस्थेच्या १२ कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण ७ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ९३.२४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. संस्थेच्या अलिबाग येथील केईएस इंग्रजी मिडीयम कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.