ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहरतर्फे "महिला बचतगट पुरस्कार व सन्मान सोहळा" कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी, ठाणे येथे रविवारी करण्यात आले होते. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या गोळीबाराच्या घटनांवर बोलताना त्या म्हणाल्या की, दोन दिवसांपुर्वी गोळीबाराची घटना घडली त्यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एक क्लीप व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी तेव्हा म्हटले होते आणि प्रत्येक भाषणात म्हणतात की, महाराष्ट्रातील पोलीस अतिशय सक्षम आहेत. राजकीय कुठचाही दबाव न आणता त्यांना ४८ तास दिले तर महाराष्ट्रातील सगळ्या मारामाऱ्या बंद होऊ शकतात.
उद्धव ठाकरे हे पक्ष वाचविण्यासाठी बाहेर पडत आहेत का? यावर त्या म्हणाल्या की, प्रत्येक राजकीय पक्षाला स्वत:च्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी फिरावे लागते. सत्तेत असलेल्यांनाही फिरावे लागते आणि नसलेल्यांनाही फिरावे लागते. राजकीय पक्षांना जनसंपर्क हा ठेवावा लागतो. त्यामुळे इथे पक्षाचा वाचवण्याचा प्रश्न नाही. प्रत्येकाला पक्ष वाढविण्यासाठी फिरावे लागते असे मत त्यांनी व्यक्त केले.