कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) ही सगळ्यात मोठी बाजार समिती आहे. या समितीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा द्यावा, अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र घोडविंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कल्याण एपीएमसीची ४० एकर जागा आहे. त्यात अन्नधान्य, फुले, भाजीपाला, कांदाबटाटा, फळे आदी बाजार भरतो. त्यासाठी नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांसह हरियाणा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक येथून भाजीपाला, अन्नधान्य व फुले येतात. त्यामुळे येथे कोट्यवधींची उलाढाल होते. जनावरांचा बाजारही येथे सुरू केला जाणार आहे. नवी मुंबई येथील बाजार समितीपाठोपाठ कल्याण एपीएमसी मोठी आहे. या एपीएमसीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा दिल्यास बाजाराचे ट्रेडिंग हे आॅनलाइन होईल. तसेच दलालीस फाटा मिळेल. त्याचा फायदा शेतकरी, विक्रेते व ग्राहकांना होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट नफा जमा होईल.रोखीच्या व्यवहारात घासाघीस असते. दलालीमुळे बाजारातील शेतमालाला भाव मिळत नाही. शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी
शेतकऱ्यांची असली, तरी हा भाव कधीकधी जाणीवपूर्वक पाडला जातो. बाजारात आवक जास्त झाली, तर भाव घसरतो. बाजारात मालाचा तुटवडा भासवून प्रसंगी भाववाढ केली जाते. त्यात शेतकरी भरडला जातो. त्याचा फटका ग्राहकालाही बसतो. या गोष्टींना आळा घालण्यासाठी कल्याण एपीएमसीला राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा देण्याची मागणी घोडविंदे यांनी केली आहे.राष्ट्रीय बाजार समितीच्या दर्जाविषयी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. राज्यातील कोणत्याही बाजार समितीला अद्याप राष्ट्रीय बाजार समितीचा दर्जा नाही. कल्याण एपीएमसीला हा दर्जा मिळाल्यास ती राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरू शकते, याकडे घोडविंदे यांनीलक्ष वेधले.आॅनलाइन ट्रेडिंगमुळे व्यवहार कॅशलेस व सुरक्षित होतील. एपीएमसीत चोºयामाºया, विक्रेत्यांचा माल व रोकड लुटण्याचे प्रकार सर्रास घडतात. आॅनलाइनमुळे त्याला वाव उरणार नाही, असे ते म्हणाले.शेतमालास योग्य भाव मिळेलकल्याणच्या लक्ष्मी बाजारात आजही भाजी व घाऊक विक्रेते जास्तीचा कर भरून व्यवसाय करत आहेत. राष्ट्रीय दर्जामुळे स्थानिक शेतकरी थेट बाजारात न जाता बाजार समितीत येऊन त्याच्या मालाला योग्य भाव मिळवू शकतो, याकडे घोडविंदे यांनी लक्ष वेधले आहे.