ठाणे : कळवा रुग्णालयाची इमारती धोकादायक झाली असून ती पाच वर्षांत पडू शकते, अशी धक्कादायक कबुली रुग्णालयाच्या डीन संध्या खडसे यांनी दिल्यानंतर त्याचे पडसाद महासभेतही उमटले. त्यांच्या वक्तव्याचे क्लिपिंगचे भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी सभागृहात सादर केले. खडसे यांनी केलेले आरोप खरे आहेत का, असा सवाल करून त्यांनी प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्टÑवादीचे सदस्यही खडसे यांच्या बाजूने उभे राहिले. आयुक्तांची परवानगी न घेता प्रशासनाच्या विरोधात बोलणे योग्य आहे का, असा सवाल शिवसेनेने करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईची मागणी केली. आधी रक्त द्या मगच मृतदेह न्या, असा प्रकार येथे सुरू असल्याचे सांगून भाजपने शिवसेनेला चांगलेच अडचणीत आणले.
कळवा रुग्णालयाच्या असुविधांबाबत पाढा वाचल्यानंतर त्याची चर्चा लागलीच महासभेतही झाली. महासभा सुरू होताच नारायण पवार यांनी खडसे यांनी केलेल्या आरोपांवर प्रशासनाचे उत्तर मागितले. तसेच सत्ताधाऱ्यांवरही त्यांनी आक्षेप घेतले. त्यानुसार याचे पुरावे सादर करण्याची मागणी सत्ताधाºयांनी केल्यानंतर पवार यांनी खडसे यांची क्लिप सभागृहाला ऐकवली. त्यानंतर सर्वच लोकप्रतिनिधी प्रशासनावर घसरले. प्रशासनाच्या कामकाजाबाबत आक्षेप घेतल्याने त्यांच्यावर काय कारवाई होणार असा सवाल पवार यांनी केला. तर विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी खडसे यांचे म्हणणे खरे असून रुग्णालयाची अवस्था दयनीय असल्याचे स्पष्ट केले.शिवसेना सदस्यांचा तिळपापडअधिकारीच अशा पद्धतीने प्रशासनावरच आक्षेप घेत असतील तर कितपत योग्य आहे, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. तर डीन यांनी असे विधान करतांना आयुक्तांची परवानगी घेतली होती का? असा सवाल माजी महापौर अशोक वैती यांनी केला. हाच मुद्दा उचलून सत्ताधाºयांनी खडसे यांना धारेवर धरले.त्यांनी या असुविधांबाबत दोन वर्षात किती वेळा पाठपुरावा केला, ३६५ दिवसापैकी त्या कितीदिवस रुग्णालयात हजर होत्या, त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणे अयोग्य असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी अशी मागणी विकास रेपाळे यांनी केली. अखेर उपायुक्त संदीप माळवी यांनी त्यांनी आयुक्तांची परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट केले.मात्र,या उत्तरावर लोकप्रतिनिधींचे समाधान झाले नाही. विरोधी पक्ष हा खडसे यांच्या बचावासाठी बोलतांना दिसला, तर सत्ताधाºयांनी खडसे यांच्या भूमिकेबाबतच संशय व्यक्त केला. खडसे यांच्याकडे कळवा रुग्णालयाचा चार्ज तीन वर्षे असून त्यांनी रुग्णालयासाठी काय काय केले.दरवर्षी एवढा निधी देऊनही कामे होत नसतील तर बिले अशीच काढली जातात का? असा सवाल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला. त्यामुळे हे त्यांचे अपयश असून ते दुसºयांवर त्याचे खापर फोडण्याचे काम त्या इतरांवर करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. परंतु, यावर प्रशासनानो केवळ सारवासारवी केली.या निमित्ताने कळवा रुग्णालयातील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यूझाला होता. त्याचे बिल 8000 झाले होते. त्यामुळे ते भरण्याच्या सुचना रुग्णालय प्रशासनाने संबधींतांना केल्या होत्या. परंतु, घरची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी चार हजार भरण्याची तयारी दर्शविली. यावर येथील डॉक्टरांनी मग तुम्ही आधी रक्तदान करा, मगच मृतदेह घेऊन जा असा अजब सल्ला दिल्याची माहिती भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी उघड केली.संपूर्ण इमारतीला दुरुस्तीची गरजया रुग्णालयात रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. परंतु, सध्या त्याच्या इमारतीची अवस्था पहिली तर अनेक ठिकाणी भिंतींना भेगा पडल्या आहेत. प्रवेशद्वारावरील छताचे काही भाग पडलेले असून लोखंडी शिगा दिसत आहेत. भिंतीवर गवत उगवले आहे, औषधे, इंजेक्शन आदींचे संपलेले साहित्य अस्तवस्त पडले असून स्लॅबही धोकादायक स्थितीत आले आहेत. त्यामुळे इमारतीची दुरुस्ती तत्काळ होणे गरजेचे आहे.