ठाणे: भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी देवीच्या मंदिरातील दानपेटी दरोडा टाकून लुटण्यात आली. सहा दिवस उलटूनही आरोपींचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. तर करोडोंच्या अफरातफरीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.वज्रेश्वरी मंदिराला बुधवारी शिवसेना उपनेते तरे यांनी भेट देऊन ही चोरीची घटना कशा पद्धतीने घडली, याबाबतची शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी वजे्रश्वरी देवस्थानामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारासंदर्भात तरे यांच्याबरोबर चर्चा केली. वज्रेश्वरी देवी हे राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यापूर्वीही मंदिरात चोरीचे प्रकार घडले असून यापूर्वीही घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही. त्यामुळे आता पुन्हा पडलेल्या दरोडयाच्या घटनेमुळे लाखो भाविकांच्या श्रद्धेला तडा गेल्याचे तरे यावेळी म्हणाले. वजे्रश्वरी मंदिरातील सुरक्षा रक्षकाला बांधून पाच ते सहा दरोडेखोरांनी देवीच्या मुख्य गाभाºयातील दानपेटया फोडून दहा ते १२ लाख रुपये लंपास केले आहेत. परंतू, घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांना कोणताही धागादोरा हाती लागलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.या सर्व घटनेची इथ्यंभूत माहिती ग्रामस्थांनी तरे यांना दिल्यानंतर दरोडयाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावा, अशी मागणी तरे यांनी गृहराज्यमंत्री केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आहे. तर देवस्थानच्या तीन कोटी रुपयांची एका विश्वस्तांनी एफडीआरमध्ये केलेल्या आफरातफरीची देखिल उच्चस्तरीय चौकशी करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्ववारे केली आहे. यावेळी गणेशपुरी येथील नित्यानंद स्वामी देवस्थानच्या विश्वस्त अॅड. संध्या जाधव, श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई आदी यावेळी उपस्थित होते.
वजे्रश्वरी मंदिरावरील दरोडयाचा तपास सीआयडी्रकडे द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 11:04 PM
भिवंडीतील वज्रेश्वरी देवीच्या दानपेटीतील लुटीच्या प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
ठळक मुद्देशिवसेना उपनेते अनंत तरे यांचे गृहराज्यमंत्र्यांना साकडेतीन कोटींच्या अफरातफरीची उच्चस्तरीय चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी