उल्हासनगर : सिंधी समाजाच्या चेटीचंड महायात्रेला झुलेलाल मंदिराजवळून सुरवात होऊन स्वामी शांती प्रकाश आश्रम येथे संपन्न होणार आहे. समाजाची सांस्कृतिक झलक यात्रेत दिसली असून खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी व स्थानिक नेते यात्रेत सहभागी झाले.
उल्हासनगरात बहुसंख्याने सिंधी समाज राहत असून सिंधी समाजातील सर्वात मोठा सण चेटीचंड आहे. सिंधी समाजाचे दैवत साई झुलेलाल यांचा अवतरण दिवस म्हणून चेटीचंड साजरा केला असून त्यानिमित्त संपूर्ण शहरातून दरवर्षी महायात्रा काढण्यात येते. झुलेलाल मंदिरापासून निघालेली महायात्रा रात्री स्वामी शांतीप्रकाश आश्रम येथे संपन्न होते. संपूर्ण शहरातून निघणाऱ्या महायात्रेत हजारो सिंधी बांधव मोठ्या उत्सवाने सहभागी होणार आहेत. तसेच देव शंकर, विष्णू, संत झुलेलाल, हनुमान, राम, कृष्ण आदी देवदेवतांचे रथ सजविण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध पक्षाचे नेते, नागरिक महायात्रेत मोठ्या उत्सवाच्या सहभागी झाले.
शहरातून निघणाऱ्या चेटीचंड महायात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण शहरभर रोषणाई केली नसून मुख्य चौक उजळून निघाले आहे. यात्रेचे प्रत्येक चौकात स्वागत करण्यात आले. यात्रेत सिंधी समाजसह अन्य समाजही सहभागी झाले असून विविध पक्षाचे राजकीय नेते यात्रेत सहभागी होऊन एकतेचा संदेश देतात. यात्रेत हिंदू धर्मातील देवदेवतांचे रथ सजविले जात असून सिंधी सांस्कृतीची झलक यानिमित्ताने शहरवासीयांना अनुभवास मिळते. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना जेवण, नाष्टा, पाणी, थंड पेय आदींची सुविधा यात्रे महोत्सव समिती व सामाजिक संघटनेकडून केली जाते.