ठाणे : एकीकडे राज्यातील सत्ताधाऱ्यांसोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस आणि गोड चहा घ्यायचा तर अन दुसरीकडे शेतकरी आंदोलनाला विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका घ्यायची, असे काहींचे धोरण असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर भाजपचे नेते सदाभाऊ खोत यांनी नाव न घेता सोमवारी ठाण्यात केली. केंद्र सरकारने लागू कायद्याच्या समर्थनार्थ ठाण्यातील पत्रकार परिषदेते ते बोलत होते.
लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतो असे खोटे बोलून फक्त आमदारकी मिळाली यासाठीचे प्रयत्न शेतकऱ्यांना दिसत आहे. एका बाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे हे उद्योग बंद करा, असा टोलादेखील त्यांनी लगावला.
काहींनी शेतकऱ्यांच्या डोक्यात भ्रम निर्माण केलाnकेंद्राने केलेल्या अध्यादेशाचे रुपांतरण आता कायद्यात झाले आहे. त्याबाबतीत अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे. तीन कायद्यांच्या माध्यमातून बाजारपेठेतून स्वातंत्र्य मिळाले आहे. nया नवीन कायद्यांमुळे शेतकरी आणि बाजारपेठांना फायदा होणार आहे. परंतु, काहींनी त्यांच्या डोक्यात भ्रम निर्माण केल्यामुळे दिल्ली येथील शेतकरी आंदोलन सुरू आहे, असे खोत म्हणाले.