कल्याण, दि. 31- मुसळधार पावसामुळे गोडाऊनची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका भागात ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते आहे. गोडाऊनची भिंत अंगावर पडून 4 जण खाली दबल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नका भागात घडली आहे. चक्की नाका येथील एका बंद गोडाऊनची भिंत कोसळण्याची घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली. या गोडाऊन च्या आत झोपलेले 4 जण या ढिगाऱ्याखाली अडकले होते, मात्र स्थानिकांनी तात्काळ धाव घेत या चौघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यामुळे या चौघांचे जीव वाचण्यात मदत झाली. चौघांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.हे चौघ जण गणपती ढोल पथकातील असून गणपती सणानिमित्त कल्याण ला आले असून रात्रीच्या वेळी या बंद गोडाऊन मध्ये झोपत होते.जोरदार पावसामुळे या गोडाऊन ची इमारत जीर्ण झाल्याने भिंत खचली आणि सदर अपघात घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गोडाऊनची भिंत कोसळून 4 जण गंभीर जखमी; जोरदार पावसामुळे भिंत खचून अपघात झाल्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 10:47 AM
मुसळधार पावसामुळे गोडाऊनची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.
ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे गोडाऊनची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.कल्याण पूर्वेच्या चक्कीनाका भागात ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळते आहे.गोडाऊनची भिंत अंगावर पडून 4 जण खाली दबल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नका भागात घडली आहे.