शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

गोखले रोड आता रडारवर

By admin | Published: May 21, 2017 3:21 AM

महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून गोखले रोडसह पाच रस्त्यांवरील इमारती, शो-रुम यावर हातोडा घालण्याचा बासनात गुंडाळून ठेवलेला प्रस्ताव शनिवारी आयत्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून गोखले रोडसह पाच रस्त्यांवरील इमारती, शो-रुम यावर हातोडा घालण्याचा बासनात गुंडाळून ठेवलेला प्रस्ताव शनिवारी आयत्या वेळेचा विषय म्हणून मंजूर केल्याने येत्या काही दिवसांत येथे कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांबरोबरच व्यापाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. मागील वर्षी आयुक्तांनी रस्ते रुंदीकरणाची मोहीम हाती घेतल्यानंतर सुरुवातीला या मोहिमेला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी देखील साथ दिली होती. परंतु जेव्हा आयुक्तांनी ठाणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या शिवाजी पथ, गोखले रोड आणि राम मारु ती रोड तसेच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे व एलबीएस रोडला जोडणारा कॅडबरी जंक्शन ते खोपट आणि एलबीएस रोड अशा पाच रस्त्यांचेही रु ंदीकरण करण्याचा प्रस्ताव पुढे आणला त्यावेळी मात्र, बडे व्यापारी आणि निवासी इमारतींमधील लब्धप्रतिष्ठ यांच्यावर कारवाई करण्यास विरोध केला. कारवाईने हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी शिवसेना, भाजपाच्या नेत्यांचे उंबरठे झिजवले होते. निवडणुकीच्या तोंडावर व्यापाऱ्यांची नाराजी ओढवून घ्यायची नाही म्हणून शिवसेना आणि भाजपाने या प्रस्तावांना विरोध केला. मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रुंदीकरणाचे हे प्रस्ताव नामंजूर करुन शिवसेना, भाजपाने आजचे मरण उद्यावर ढकलले. रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव आपणच कसे रद्द केले हे व्यापाऱ्यांना भासवण्याकरिता शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयाचे राजकारण चांगलेच रंगले होते. आयुक्तांनी फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात मोहीम उघडली असतांना गोखले रोडवरील अनधिकृत बांधकांमावरही कारवाईची मागणी राष्ट्रवादीने लावून धरली होती. फेरीवाल्यांवर कारवाई सुरु झाल्याने व्यापारी वर्ग खूष झाला होता व आयुक्तांच्या बेधडक कारवाईचे गोखले रोड, राम मारुती रोडवरील बोलका उच्च मध्यमवर्गीय समर्थन करीत होता. शनिवारी झालेल्या महासभेत सर्वांना समान न्याय देऊन गोखले रोडवरील अतिक्रमाणांवर देखील कारवाई करण्याची भूमिका शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी मांडली. त्याला विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी लागलीच पाठींबा दिला. या भागातही कारवाई झालीच पाहिजे येथील रस्ता मोकळा होणे ही काळची गरज असल्याचे मत व्यक्त करीत सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी देखील या कारवाईचे समर्थन केले.गरज सरो अन वैद्य मरोनेमकी हीच संधी साधत आयुक्तांनी आयत्या वेळेचा प्रस्ताव मांडून पाच प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणांवरील कारवाईचा मार्ग मोकळा केला. निवडणुकीच्या तोंडावर गोखले रोड परिसरातील नगरसेवक संजय वाघुले व विलास सामंत यांनी या भागातील कारवाई रोखली होती. श्रेयाकरिता धडपडलेल्या शिवसेना आणि भाजपाच्याच मंडळींनी कारवाईचा आग्रह धरल्याने वाघुले यांनाही माघार घ्यावी लागली. ‘गरज सरो अन वैद्य मरो’ यानुसार आता सर्वपक्षीयांनी कारवाईची तळी उचलून धरली आहे. राजकीय पक्षांच्या या धोरणामुळे व्यापारी संतप्त झाले आहेत.