शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

गोपिकांचाही जल्लोष

By admin | Published: September 07, 2015 3:58 AM

न्यायालयापाठोपाठ राज्यशासनाने घालून दिलेल्या अटी, पावसाची पाठ आणि रणरणते ऊन या वातावरणात रविवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात कल्याण डोंबिवलीत काही

ठाणो:  न्यायालयांचे र्निबध, पाण्याचा किमान वापर, डीजेची अनुपस्थिती, खालती संरक्षक गादी,  दुष्काळाचे सावट असे संमिo्र वातावरण जरी  यावर्षी असले तरी यंदा गोविंदांचा उत्साह नेहमीसारखाच जल्लोषपूर्ण होता.जिल्ह्यात महिलापथकेही तितक्याच उत्साहात सहभागी झाली होती.  या गोविंदा पथकांनी  शनिवार मध्यरात्रीपासूनच दही हंडी फोडण्यास सुरूवात केली होती. 
सेफ्टी बेल्ट, विमा कवच,  आदींची व्यवस्था करून आयोजकांनीही गोविंदांची काळजी घेतली होती.  न्यायालय तसेच राजकीय घडामोडींचा विचार करता दही हंडीचा उत्साह ओसरला आहे असे वाटत होते. अनेक गोविंदा पथकांनीही दही हंडीमध्ये सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली होती. 
तसेच  मुंबईच्या पथकांनीही ठाण्यामध्ये हंडी न फोडण्याचा निर्णय घेतला होता  मात्र प्रत्यक्षात ही सारी कटुता विसरून  मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्यातील दही हंडीला भरभरून प्रतिसाद दिला. गोविंदांच्या ट्रक, टेम्पोंमुळे ट्रॅफिक जॅम होऊ नये म्हणून ते  हायवेलगतच पार्क करायचे व गोविंदांनी पायी दहीहंडीच्या ठिकाणार्पयत जायचे असा नवा पायंडा पोलिसांनी गेल्या दोन वर्षापासून पाडला होता. तो यंदाही अनुसरला गेला. यामुळे अनेक गोविंदांनी ट्रक, टेम्पाेंऐवजी दुचाकींवरून डबल अथवा टिबल सीट जाणो पसंत केले होते. तसेच मोटरसायकलवर उभे राहून काहींनी स्टंट करण्याचाही प्रय} केला. गोविंदा पथकांच्या वाहनामध्येही डिजे, ढोल ताशे न वापरता मंद सुरात वाजणारा  साधा डेक लावण्यात आला होता.  
 

कल्याण: न्यायालयापाठोपाठ राज्यशासनाने घालून दिलेल्या अटी, पावसाची पाठ आणि रणरणते ऊन या वातावरणात रविवारी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात कल्याण डोंबिवलीत काही अपवाद वगळता फारसा उत्साह दिसून आला नाही. दरम्यान बहुतांश आयोजकांकडून खर्चाला फाटा देऊन त्याची रक्कम आपत्तीग्रस्तांना देण्यात आली.शहरातील मुख्य चौकांसह गल्लोगल्लीत दरवर्षी दिसून येणाऱ्या हंडया यंदा दिसल्या नाहीत. सायंकाळी बघ्यांची काहीप्रमाणात गर्दी झाली असली तरी त्यात पूर्वी सारखा उत्साह नव्हता. यंदा गोविंदा पथकांची संख्याही रोडावली.कल्याणातील आढावा घेता बहुतांश आयोजकांनी आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला. येथील शिवसेना शहर शाखेच्या वतीने शिवाजी चौकात साजरा केलेल्या उत्सवात ठाकुर्ली येथील इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५हजार रूपयांची मदत देण्यात आली. मनविसेचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्यावतीने बेतुरकरपाडा येथे आयोजित केलेल्या उत्सवात ३० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यात आली. मदतीसाठी आयोजकांबरोबरच गोविंदा पथकांचा देखील पुढाकार होता. जुनी डोंबिवली मित्र मंडळ या गोविंदा पथकांना सलामीतून मिळालेली रककम ते अभिनेता नाना पाटेकर यांच्या दुष्काळग्रस्त मदत निधीला देणार आहेत. डोंबिवलीतील कोपर रोड शिवसेना शाखेच्या वतीने प्रकाशमय जीवनाची संदेश देणारी दहीहंडी बांधण्यात आली होती. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने विनामूल्य नेत्रचिकित्सा शिबीरासाठी ही हंडी अर्पण केल्याचे आयोजक संजय पावशे यांनी सांगितले. आमदार रविंद्र चव्हाण यांनी पुर्वेकडील बाजीप्रभु चौकात उभारलेल्या मोठया रकमेची दहीहंडी फोडण्यासाठी शहरातीलच नव्हे तर ठाणे, मुंबईतील पथके डोंबिवलीत दाखल झाली होती. दहीहंडी रद्द करून लाखाची मदतपडघा: मीनाक्षी फाऊंडेशनतर्फे दहिहंडी आयोजिली होती. मात्र शबाना शेख यांचा मृत्यू झाल्याने ती रद्द केली. तिचे एक लाख शेख कुटुंिबयांना खासदार पाटील यांच्या हस्ते दिले.खर्डीत पारंपरिक पद्धतीने खर्डी: कृष्ण अष्टमीचा सण पारंपारीक पध्दतीने पार पडला. रात्री गावातील मंदिरामध्ये कृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने भजन किर्तनाच्या गजरात पार पडला. टिटवाळ्यात उत्साहात टिटवाळा : शहरासह ग्रामीण भागात मोठयÞा उत्साहात दहीहंडी झाली. डीजेच्या तालावर फेर धरत बाळ गोविंदासह मोठ्या गोविंदानी दहीहंडयÞा फोडल्या.बोल बजरंग...दहीहंडी फोडण्यासाठी पूर्वीपासून व्यायामपट्टूचे सर्वांनाच आकर्षण. हल्ली ट्रेंण्ड बदलतो आहे. तेव्हा वर्तकनगरमधील गोविंदाने लक्षवेधण्यासाठी असा हनुमानाचा मुखवटे धारण केला.तारकांचे आकर्षणठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानची दहिहंडीला रविवारी चित्रपट अभिनेता सुनिल शेट्टीने कन्येसह भेट दिली. सोबत सूरज पंचोली व रविंद्र फाटक.सोफिया झाली मोहीतठाण्यातल्या रघुनाथनगरमधल्या गोविंदाची मोहिनी ब्राझिलच्या सोफियालाही इतकी पडली की, तिला हा सोहळा शूट करावासा वाटला.