लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नौपाडा येथील राम मारुती रोडवर सोनसाखळी चोरणाऱ्या हिमांशू वर्मा (२२, रा. पलावा, डोंबिवली) याला नौपाडा पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्यानंतर अन्य चौघांनाही अटक करून सात गुन्ह्यांमधील चार लाख ४८ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी बुधवारी दिली.राम मारुती रोडवरून जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी खेचून दोघांनी पलायन केल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विनायक धुरी आणि नितीन थोरात यांनी पाठलाग करून हिमांशू याला अटक केली. त्याने फरहान शेख या साथीदाराच्या मदतीने नौपाड्यातील पाच ठिकाणी सोनसाखळी व वाहन चोरी केल्याची कबुली दिली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे, हवालदार साहेबराव पाटील, अंमलदार गोरख राठोड आणि किशोर काळे आदींच्या पथकाने त्यांच्या ताब्यातून चोरीतील सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एक लाख २२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यातील फरहान शेखचा शोध घेण्यात येत आहे.अन्य गुन्ह्यांचा उलगडाचोरीच्या अन्य एका घटनेच्या तपासात विनोद उर्फ शुभम तायडे (रा. जोगेश्वरी) आणि झाकीर शेख (रा. मुंब्रा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीतील तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच मोबाइल चोरीच्या एका गुन्ह्यात तेजस तांडेल (रा. वागळे इस्टेट, ठाणे) आणि किशोर साथलिया (रा. वर्तकनगर, ठाणे) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २४ हजारांचे दोन मोबाइल हस्तगत केल्याचे उपायुक्त अंबुरे यांनी सांगितले.
सोनसाखळी, मोबाइलची चोरी करणारी टोळी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 1:07 AM
राम मारुती रोडवरून जाणाऱ्या एका महिलेची सोनसाखळी खेचून दोघांनी पलायन केल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्याचे बीट मार्शल विनायक धुरी आणि नितीन थोरात यांनी पाठलाग करून हिमांशू याला अटक केली.
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरी सात गुन्ह्यांतील साडेचार लाखांचा ऐवज जप्त