शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

सुवर्णकन्या मधुरिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 6:05 AM

टेबल टेनिसच्या स्पर्धांना जाण्यामुळे तिची शाळा अनेकदा बुडायची, पण तिची शाळा आणि खासकरून शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मरिना, इतर शिक्षिकांचा तिला नेहमीच पाठिंबा राहिला.

राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक पटकावून देणारी मधुरिका पातकर-तोरगलकर ही खऱ्या अर्थाने ठाण्याची ‘सुवर्णकन्या’ ठरली. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरांवर चमकदार कामगिरी करून मधुरिकाने ठाण्याचे नाव पुन्हा एकदा सुवर्णाक्षरांत कोरले. वयाच्या सातव्या वर्षांपासून मधुरिका टेबल टेनिस खेळत आहे. तिचे शेजारी असलेले अभिषेक सोपारकर टेबल टेनिस खेळायचे. त्यांच्या काकू म्हणजेच मधुरिकाच्या प्रशिक्षिका शैलजा गोहाड यांच्याशी तिचा परिचय झाला आणि तिथून ती टेबल टेनिस खेळू लागली. गोहाड यांच्या हाताखालीच तिची कारकीर्द घडली. होली क्रॉस शाळेतून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. लहानपणी तिला नृत्य आणि चित्रकलेची आवड होती. ती स्विमिंगही करत होती. तिच्यात खूप ऊर्जा असल्याने ती आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू व्हावी, अशी तिच्या वडिलांची दृढ इच्छा होती. गोहाड यांनी मधुरिकाने कोणतेही एक क्षेत्र निवडावे, असे तिच्या पालकांना सांगितल्यावर वडिलांनी तिला टेबल टेनिस हेच क्षेत्र निवडण्याचा सल्ला दिला. टेबल टेनिसच्या स्पर्धांना जाण्यामुळे तिची शाळा अनेकदा बुडायची, पण तिची शाळा आणि खासकरून शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मरिना, इतर शिक्षिकांचा तिला नेहमीच पाठिंबा राहिला. ती स्पर्धा जिंकत होती, तिच्या यशाचे कौतुक होत होते, पदकांवर पदकं ती पटकावत होती. इयत्ता दहावीत असताना बोर्डात येण्याची तिची इच्छा होती. त्यासाठी तिने टेबल टेनिस सोडायचा निर्णय घेतला. तिचे वडील, प्रशिक्षिका गोहाड आणि त्यांच्या सासूबाई यांनी तिला समजावले, ‘तू टेबल टेनिस सोडू नकोस. तू या खेळात खूप पुढे जाशील’, असा कानमंत्र दिला. मुलीने डॉक्टर, सीए अशा क्षेत्रांत करिअर करावे, अशी तिच्या आईची इच्छा होती. परंतु, वडिलांनी मुलीला टेबल टेनिसपटू करण्याचे स्वप्न पाहिले होते. मला आर्थिक चणचण कधीही भासली नाही. टेबल टेनिससाठी खूप खर्च असतो. खेळाडूसाठी घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, असे ती सांगते. तिचे दैनंदिन कार्यक्रम पालक पाहायचे. तिची लहान बहीण राधिका हिला टेबल टेनिसची मुळात आवड नव्हती. तिला नृत्य फार आवडायचे. परंतु, आपल्या मोठ्या बहिणीसाठी ती टेबल टेनिस खेळू लागली आणि मधुरिकाला ती अधूनमधून सल्लेही देते. २००४ मध्ये तिला ओएनजीसीकडून स्पॉन्सरशिप मिळाली आणि २००६ साली तिला त्याठिकाणी नोकरीही लागली. एमसीसी महाविद्यालयात तिने पुढील शिक्षण घेतले आणि महाविद्यालयानेही तिला तिच्या खेळासाठी साथ दिली. १९९९ साली ती सबज्युनिअरमध्ये, तर २००२ साली ज्युनिअरमध्ये भारतात क्रमांक-१ वर राहिली होती. अभ्यास आणि टेबल टेनिस यावर तिने नियोजनबद्धरीत्या लक्ष केंद्रित केले. डिसेंबरपर्यंत टेबल टेनिस खेळायचे आणि त्यानंतर अभ्यासाकडे लक्ष द्यायचे, अशी ढोबळमानाने तिने वाटणी केली होती. टेबल टेनिसचा फायदा तिला अभ्यासातही झाला. टेबल टेनिसमध्ये प्रचंड एकाग्रता लागते. त्याच एकाग्रतेमुळे कमीतकमी वेळात तिचा अभ्यास होऊ लागला. राष्ट्रकुल स्पर्धेत २०१० मध्ये तिने रौप्यपदक पटकावले. २०११ हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट होते. नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये टॉप-३२ मध्येदेखील ती नव्हती. तेव्हा खेळावे की खेळू नये, ही भावना तिच्या मनात होती, तेव्हा तिचे पती ओमकार (हे तिचे त्यावेळी मित्र होते), प्रशिक्षिका गोहाड, तिचे पालक, बहीण यांनी तिचे मन खंबीर केले. ठाणे जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनने तिला खूप सहकार्य केले. असोसिएशनचे यतीन टिपणीस यांचा तिच्यावर खूप विश्वास होता. २०१२ मध्ये नॅशनल रँकिंगमध्ये ती टॉप-८ मध्ये होती, तर २०१३ साली ती भारताच्या टीममध्ये आली. २०१४ मध्ये स्कॉटलंडमधील मॅच हरल्यानंतर मात्र तिने कठोर परिश्रम करण्यास सुरुवात केली. डॉ. नितीन पाटणकर यांच्याकडे ती मेंटल ट्रेनिंगसाठी गेली. २०१५ साली तिचा ओमकार यांच्याशी विवाह झाला. ते स्वत: टेबल टेनिसपटू आहेत. त्यांचे तिला नेहमीच मार्गदर्शन मिळते. त्यांनी फिजिकल फिटनेसवर भर देण्याबाबत तिला सल्लेही दिले. किशोर पुजारी यांच्याकडे व्यायामाचे प्रशिक्षण घेतले. २०१६ च्या गुडगाव नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ती जिंकली. तिचे पतीही या स्पर्धेत खेळले होते. २०१६ पासून राष्ट्रकुल स्पर्धेचे कॅम्प सुरू झाले. या कॅम्पमध्ये तिचे सांघिक कौशल्य वाढले. प्रशिक्षक सौम्यदीप रॉय व इटालियन प्रशिक्षक मेसिकोम कॉन्स्टॅटिनी यांनी हे शिबिर घेतले. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन तिला लाभले. स्पर्धा सुरू झाली, तेव्हा ती आणि तिची टीम खूप सकारात्मक होती. सुवर्ण नाहीतर रौप्यपदक पटकावू, याची तिला पुरेपूर खात्री होती. प्रशिक्षक रॉय आणि कॉन्स्टॅटिनी त्यांना म्हणाले, ‘तुम्ही जिंकलात तर हीरो व्हाल’ आणि हे शब्द तिने लक्षात ठेवले. टेबल टेनिस खेळताना प्रतिस्पर्धी खेळाडूशी आमचे शत्रुत्व असते, पण खेळ संपला की, आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी असतो, असे ती सांगते. २८ एप्रिल रोजी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ती सहभागी होत असून यासाठी ती २४ एप्रिलला रवाना होत आहे. आॅगस्टमध्ये एशियन चॅम्पियनशिपमध्ये ती खेळत आहे. आॅलिम्पिक्समध्ये भारताची टीम जावी आणि या टीममध्ये आपला सहभाग असावा, अशी तिची इच्छा आहे. प्रशिक्षिका गोहाड मधुरिकाचे तोंडभरून कौतुक करताना ती खूप मेहनती, विश्वासू, जिद्दी, भावुक असल्याचे वर्णन करतात. तिचा प्रशिक्षकांवर गाढ विश्वास आहे. खेळताना तळहाताला लागूनही ती जिद्दीने खेळत होती. जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी याचे दुसरे नाव मधुरिका आहे...

टॅग्स :Sportsक्रीडा