शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

केडीएमटीच्या कंत्राटी चालक, वाहकांना येणार अच्छे दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:54 PM

वेतन, महागाईभत्त्यात वाढ; उद्या होणार शिक्कामोर्तब

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील आस्थापनेवर कंत्राटी पद्धतीने घेतलेले चालक आणि वाहक यांच्या वेतनात वाढ होणार आहे. ही वाढ मूळ वेतन आणि महागाईभत्त्यात होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव व्यवस्थापनाने शुक्रवारच्या परिवहन समितीच्या सभेत मान्यतेसाठी पटलावर ठेवला आहे. प्रस्ताव मान्यतेनंतर चालकांना १७ हजार ५८९ तर, वाहकांना १६ हजार ७७४ रुपये वेतन मिळणार आहे.केडीएमटी उपक्रमाच्या आस्थापनेवर मार्च २०१३ पासून हे कंत्राटी चालक आणि वाहक कार्यरत आहेत. सध्या ११ चालक तर ४८ वाहक सेवेत असून, किमान वेतन कायद्यानुसार त्यांना अनुक्रमे १२ हजार ९१६ आणि १२ हजार ४९६ रुपये वेतन मिळत आहे. परंतु, महागाईभत्त्यात झालेली वाढ पाहता चालक आणि वाहकांच्या मूळ वेतनासह महागाईभत्त्यात वाढ होणार आहे. सध्या मिळणाऱ्या चालकांच्या वेतनात चार हजार ६७३ रुपयांची वाढ सुचविली गेल्याने प्रस्ताव मंजुरीअंती त्यांना १७ हजार ५८९ रुपये वेतन मिळणार आहे. तर, वाहकांना मिळणाºया वेतनात चार हजार २७८ रुपयांची वाढ सुचविली गेल्याने त्यांना १६ हजार ७७४ रुपये वेतन उपलब्ध होणार आहे.दरम्यान, एकीकडे उपक्रमातील चालक आणि वाहकांचा पगार वेळेवर होत नाही. त्याला लागणारा विलंब तसेच नव्या वेतनवाढीच्या प्रस्तावामुळे तिजोरीवर पडणारा आर्थिक बोजा या पार्श्वभूमीवर परिवहन समितीमधील सर्वपक्षीय सदस्य संबंधित प्रस्तावाबाबत कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.अडीच लाखांचा बोजाकायद्यानुसार संबंधित कंत्राटी चालक आणि वाहकांना वेतनवाढ मिळणार असली तरी त्यामुळे उपक्रमावर महिन्याला दोन लाख ५६ हजार ७४७ रुपये तर, वर्षाला ३० लाख ८० हजार ९६४ रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.सदस्य सकारात्मकचालक आणि वाहकांना कायद्यानुसार वेतन मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव वेतनाच्या प्रस्तावासंदर्भात माझ्यासह समितीचे सर्व सदस्य सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया सभापती मनोज चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली.