लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वागळे इस्टेट परिमंडळातील वर्तकनगर पोलीस ठाण्यातील दोघे पोलीस कर्मचारी आता कोरोनातून मुक्त झाले झाले आहेत. त्यांची चाचणी तिसरीही चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले आहे. भार्इंदर पाडा येथील विलगीकरण केंद्रातून ते घरी परतल्यानंतर त्यांचे वर्तकनगर पोलीस तसेच स्थानिक नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत टाळयांच्या गजरात जोरदार स्वागत केले. कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या २३ वरुन १३ वर आल्यामुळे ठाण्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.या दोन कर्मचाºयांसह तिघे पोलीस कर्मचाºयांना १५ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या चाचणीवरुन स्पष्ट झाले होते. त्यांच्यापैकी दोघांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तर तर एकाला कळवा येथील सफायर रुग्णालयात दाखल केले होते. पैकी २९ एप्रिल रोजी एकाची चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे त्याला सफायर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अन्य दोघांनाही कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. त्यामुळे त्यांना भार्इंदरपाडा येथील विलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते. तिथे ३० एप्रिल रोजी त्यांची पुन्हा दुसरी चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला. त्यानंतर पुन्हा २ मे रोजी त्यांची तिसरी तपासणी करण्यात आली. त्यांची ही चाचणीही निगेटीव्ह आली. अखेर वैद्यकीय सल्ल्यानुसार यास दोघांनाही शनिवारी भार्इंदर पाडा येथील विलगीकरण केंद्रातून घरी सोडण्यात आले. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्यासह कर्मचाºयांनी त्यांचे तिथे स्वागत केले. तिथून त्यांच्यापैकी एकाचे लोकमान्यनगर येथे तर दुसºयाचे नौपाडयातील घराजवळच्या परिसरातही वर्तकनगर पोलिसांसह स्थानिक रहिवाशांनी पुष्पवृष्टी करीत टाळयांच्या गजरात स्वागत केले.* ठाणे शहर आयुक्तालयात २३ पैकी सहा कर्मचारी आणि चार अधिकारी असे आठजण कोरोनामुक्त झाल्यामुळे ही संख्या १३ झाली.* कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील २१ अधिकारी आणि ९४ कर्मचाºयांना होम कॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. तर नऊ कर्मचाºयांना केंद्रात कॉरंटाईन ठेवले आहे. यामध्ये वर्तकनगरचे २८ कर्मचारी, मुंब्रा येथील सहा अधिकारी ३८ कर्मचारी तर मुख्यालयातील २४ कर्मचाºयांचा समावेश आहे.
सुखद बातमी...ठाण्यातील आणखी दोघा कोरोनामुक्त पोलिसांचे पुष्पवृष्टीने जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 11:44 PM
वर्तकनगरच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची तिसरी चाचणी निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना भार्इंदर पाडा येथील विलगीकरण केंद्रातून घरी सोडण्यात आले आहे. या दोघांचेही पोलीस कर्मचाऱ्यांनी टाळयांच्या गजरात स्वागत केले. आता कोरोनाग्रस्त पोलिसांची ठाण्यातील संख्या २३ वरुन १३ वर आली आहे.
ठळक मुद्देवर्तकनगरचे तिघेही पोलिसांची झाली कोरोनातून मुक्तताकोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या २३ वरुन १३ वर आल्यामुळे ठाण्यातील पोलिसांना मोठा दिलासा