ठाणे - पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमंतीच्या विरोधात सोमवारी कॉंग्रेस आणि समविचारी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. त्यानुसार ठाण्यातही कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेने रस्त्यावर उतरुन वाहतुक व्यवस्था एक तास रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी हे आंदोलन योग्यरित्या हातळल्याने वााहतुक व्यवस्था थिम्या गतीने सुरु होती. कॉंग्रेस आणि मनसेने पायी चालून भाजपाचा निषेध केला तर राष्ट्रवादीने बैलगाडी, हातगाडी इर्स्टन एक्सप्रेसवर उतरुन मुंबईकडे जाणारी वाहतुक काही काळ रोखून धरली होती. परंतु या तीनही पक्षांनी अचानक तिनहात नाका येथे ठिय्या दिल्याने पोलीसांनी अवघ्या काही क्षणातच हे आंदोलन मोडून काढत तीनही पक्षातील अनेकांना ताब्यात घेतले. भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने भारत बंद आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार सोमवारी हा बंद पुकारण्यात आला. सकाळी १० वाजेपर्यंत जनजीवन सुरळीत होते. त्यानंतर मनसेनेचे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी ठिकठिकाणी रिक्षाचालक, खाजगी वाहन चालक, दुकानदार, व्यावसायिक आदींना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यानी शांततेच्या मार्गाने मोदी सरकराचा निषेध करीत ठिकठिकाणी आंदोलन केले. अखेर १०.३० च्या सुमारास या आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. कॉंग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन रॅली काढली. यामध्ये कॉंग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी हे पायी चालत होते. तर राष्ट्रवादीने, बैलगाडी आणि घोडागाडी घेऊन आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आदींसह शेकडो पदाधिकारी यात सहभागी झाले होते. पाचपाखाडी ते तीनहात नाका पर्यंत ईर्स्टन एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने तीनही पक्षाचे पदाधिकारी निघाले. नितिन कंपनी येथे काही वेळ, त्यानंतर तीनहात नाका येथे या आंदोलनकर्त्यांनी आपला तळ ठोकला. येथे ठिय्या आंदोलन करुन मुंबईकडे जाणारा आणि मुंबईहून नाशिककडे येणारा मार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच सावध भुमिका घेत, तीनही पक्षाच्या नेत्यांना ताब्यात घेतले. यामध्ये राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे, कॉंग्रेसचे नेते सुभाष कानडे, मनसेचे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला.वाढत्या महागाईच्या विरोधात हे आंदोलन आहे. पेट्रोल डिझेल, गॅसचे दर हे वाढले असून त्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे हा निषेध व्यक्त करण्यासाठी या बंदमध्ये आम्ही सहभागी झालो आहोत.(जितेंद्र आव्हाड - आमदार, राष्ट्रवादी )
महागाईचा स्तर खुप वाढला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर गगणाला भिडले आहेत. त्यामुळे मोदी सरकारचा निषेध या माध्यमातून केला जात आहे.(मनोज शिंदे - शहर अध्यक्ष- कॉंग्रेस)
महागाईचा स्तर रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. त्यांचाच हा एकप्रकारे उद्रेक आहे.(अविनाश जाधव - जिल्हा अध्यक्ष, मनसे)चौकट - सोमवार असल्याने मध्यवर्ती ठाण्यातील बहुतेक ठिकाणची दुकाने बंद होती. परंतु इतर ठिकाणीसुध्दा व्यावसायिकांनी उर्त्स्फुतपणे दुकाने बंद ठेवली होती. तसेच मॉलधारकांनीसुध्दा मॉल बंद ठेवली होती. तसेच शहरातील सर्वच्या सर्व पेट्रोलपंप बंद होती. परंतु वाहतुक व्यवस्थेवर या बंदचा कोणत्याही स्वरुपाचा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.ठाण्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. लोकांना उर्त्स्फुतपणे बंद पाळला होता. या आंदोलनादरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या पदाधिकाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.