शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
5
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
6
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
7
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
8
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
9
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
10
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
11
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
12
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
13
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
14
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
15
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
16
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
17
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
18
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
19
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
20
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

मीरा भाईंदरच्या न्यायालयासाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदांना अखेर शासनाची मंजुरी

By धीरज परब | Published: September 28, 2024 2:55 PM

मीरा भाईंदरमध्ये न्यायालय असावे व ठाण्याला न्यायालयात जाण्यासाठी वेळ, पैसे व इंधन वाया जाणे थांबवावे अशी मागणी शहरातील वकील संघटने सह नागरिकांची देखील होती.

मीरारोड - कर्मचाऱ्यांच्या पदांना राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर विविध कारणांनी रखडलेले मीरा भाईंदर शहरातील दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग हे न्यायालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने १२ कायम पदे तर ४ बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेण्याची पदे मंजूर केली आहेत . 

मीरा भाईंदरमध्ये न्यायालय असावे व ठाण्याला न्यायालयात जाण्यासाठी वेळ, पैसे व इंधन वाया जाणे थांबवावे अशी मागणी शहरातील वकील संघटने सह नागरिकांची देखील होती. परंतु सदर न्यायालयाचे काम विविध कारणांनी रखडत राहिले.  न्यायालयाच्या कामाला गती मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा सुरु केला. निधीची मंजुरी करून घेतली. न्यायालयाची इमारत व न्यायाधीशांचे निवासस्थान बांधून झाले आहे. आतमध्ये सर्व फर्निचर, यंत्रणा आदी तयार झाले आहे. परंतु न्यायालयाचे कामकाज करण्यासाठी कर्मचारी पदांना मंजुरी केली नसल्याने त्यात विलंब होऊ लागला असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. 

शासनाकडे पाठपुरावा करून आता पद मंजुरी सुद्धा करून आणली आहे. १ सहाय्यक अधीक्षक पद,  १ लघुलेखक , २ वरिष्ठ लिपिक ,  ४ कनिष्ठ लिपिक व ३ बेलीफ अशी एकूण १२ पदे मंजूर केली आहेत. तर २ शिपाई, १ पहारेकरी व १ सफाई कामगार अशी ४ पदे बाह्य यंत्रणाद्वारे घेण्यात येणार आहेत. तसा शासन निर्णय विधी सल्लागार व सह सचिव विलास गायकवाड यांनी जारी केला. त्याला विधिमंडळाची अंतिम मंजुरी हिवाळी अधिवेशनात मिळाल्यानंतर जानेवारी २०२५ पासून मीरा भाईंदर चे स्वतंत्र न्यायालय सुरु होईल अशी खात्री आहे. न्यायालय सुरु झाल्यास शहरातील नागरिकांसह, प्रशासनाला देखील दिलासा मिळून ठाण्याच्या खेपा वाचणार आहेत असे सरनाईक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Courtन्यायालय