सुरेश लोखंडेठाणे : घरकूलेसारख्या भरीव शासकीय योजनेसह नळपाणी पुरवठा, परसबागेच्या कृषी योजना, आमृत आहार, आरोग्यवर्धक योजना, शौचखड्डे, वृक्ष लागवड आदी जिल्हा परिषदेच्या योजनांसह जिल्हा प्रशासनाच्या महसूल योजना, दाखल्यांचे वाटप, महसूलच्या भरीव लाभाच्या सवलती आता मुरबाड तालुक्यातील १४ गांवकऱ्यांच्या दारातच जाणार आहते. यापैकी प्रथम वडाचीवाडी या शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीच्या गावाची निवड केली आहे. स्वत:च्या गावाचा विकास साधण्यासाठी उत्स्फुर्त लोकसहभाग आणि त्यांचे श्रमदान आदींमुळे वडाच्यावाडीत शासनाच्या योजनांना स्वत:हून गावात येणे भाग पडत आहे. अवघे ७० घरांची ही वडाचीवाडी मुरबाड व म्हसा येथून २५ किमी. अंतरावर आहे. यातील गावकऱ्यांची एकजूट, सार्वजनिक हितासाठी त्यांचा उत्स्फुर्त सहभाग, श्रमदानासाठी सातत्याने प्रत्येकाची आघाडी, त्यातून साधला जाणारा गावाचा विकास आदींवर लक्ष केंद्रीत करून या वडाच्या वाडीतील गावकऱ्यांसाठी आता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी शासनाच्या योजना थेट गावातच पोहोच करण्याचा निर्धार केला आहे. या गावकऱ्यांना व योजनेस पात्र ठरणाऱ्यांना शासनाच्या कार्यालयात आता जाण्याची गरज नाही. तर स्वत:हून प्रशासनच या गावात जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसहभाग व श्रमदानातून गावविकास साधण्यासाठी पुढे येणाऱ्यां १४ गावांच्या गावकऱ्यांसाठी पहिल्या टप्यात या मोहिमेचा लाभ दिला जाणार आहे.वडाच्या वाडीतील गावकऱ्यांना या मोहिमेचा लाभ प्रायोगिकतत्वावर प्राधान्यक्रमाने देण्याचे निश्चित झाले आहे. या गावकऱ्यांचा लोकसहभाग व श्रमदानाच्या प्रोहत्सानातून पुढे येणा-या अन्यही गावांना या मोहिमेत प्राधान्यक्रमाने सहभागी करून घेण्याचे नियोजनही केले आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या गावांमध्ये शासनाच्या योजना स्वत:हून पोहोच करण्यासाठी यंत्रणा सतर्क केली जाणार आहे. संबंधीत तालुका पातळीवरील तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींसह स्थानिक पातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेवक, रेशनिंग कार्ड वितरण यंत्रणा आदी यंत्रणा त्यांच्या योजना, दाखले स्वत:हून लाभार्थ्यांना घरपोहोच करणार असल्याच्या वृत्तास जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी दुजोरा दिला आहे.गावकऱ्यांचा लोकसहभाग आणि त्यांच्या श्रमदानातून गावाचा होणाऱ्यां विकास साधला जात असताना त्यांना ईजीएसच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होणार आहे. यातून रस्त्यांची देखील कामे होतील. घरकूल योजनेच्या लाभार्थ्यांचे बीपीएलकार्डची चौकशी करून त्यास त्वरीत रेशनकार्ड देण्याचे नियोजन केले जाईल. अंगणवाडीचे पोषण आहार, आमृत आहारचा लाभ वयोवृध्द महिलांसह गरोदर माताना दिला जाईल. सुदृढतेसाठी त्वरीत आरोग्य तपासणी, ब्लड टेस्टिंग, औषधोपचार दिला जाईल. घरांवर पडणारे पावसाचे पाणी वाहून जावू नये, त्याचा पुनर्वापर करणे शक्य व्हावे, यासाठी रेनवाटर हार्वेस्टिंग स्कीम राबवणार. शौसखड्डे तयार करणार, वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार केले जातील. त्यास ईजीएसच्या माध्यमातून मजुरी मिळवून दिली जाईल. परसबाग तयार करून ताज्या पालेभाज्य मिळवता याव्या, कुपोषण मुक्तीसाठी देखील उपयुक्त ठरणाऱ्यां परसबागेसाठी कृषी विभागाच्या योजना राबवून बीबियाणे देण्याचे नियोजन आहे. मुबलक पाण्यासाठी पाणी पुरवठा योजना सुरू करण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांचा लोकसहभाग प्राप्त केला जाणार आहे.गावविकासाची ही लोकचळवळ व्हावी यासाठी गावकऱ्यांना मोटीवेट करणारे मुरबाड तालुक्यातील शेलारी येथील शिक्षक योगेंद्र बांगर यांच्यावर खास क्वाडीनेटर म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बांगर यांचे सहकार्य घेण्यासाठी सीईओ यांनी त्यांची बदली खास मुरबाडला तालुका पातळीवर करून घेतली आहे. टोकावडेजवळील फांगणे गावातील सर्व आजीबार्इंना एकत्र करून त्यांना शालेय शिक्षण बांगर यांनी या आधी दिले आहे. आताही त्यांनी शेलारी येथे निसर्ग शाळा सुरू केली आहे. लोकसहभाग मिळवण्याचे कौशल्य बांगर यांच्यात असल्यामुळे गावविकासाच्या मोहिमेसाठी त्यांचे सहकार्य जिल्हा परिषद घेत आहे. गावकऱ्यांचा लोकसहभाग आणि त्यांच्या श्रमदानातून ‘गावविकास’ साधणारी ‘लोकचळवळ’ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सीईओ यांनी नुकताच संयुक्तपणे गावखेड्यांचा पाहाणी दौरा करून गाव,पाडे, त्यातील ग्रामस्थ, समाजसेवक आदींची चाचपणी केली आहे.
श्रमदानाच्या जोरावर वडाच्या वाडीसह १४ गावांत आता शासकीय ‘योजना’ - श्रमदानातून ‘गावविकास’ साधणारी ‘लोकचळवळ’
By सुरेश लोखंडे | Published: June 22, 2019 7:18 PM
स्वत:च्या गावाचा विकास साधण्यासाठी उत्स्फुर्त लोकसहभाग आणि त्यांचे श्रमदान आदींमुळे वडाच्यावाडीत शासनाच्या योजनांना स्वत:हून गावात येणे भाग पडत आहे. अवघे ७० घरांची ही वडाचीवाडी मुरबाड व म्हसा येथून २५ किमी. अंतरावर आहे. यातील गावकऱ्यांची एकजूट, सार्वजनिक हितासाठी त्यांचा उत्स्फुर्त सहभाग, श्रमदानासाठी सातत्याने प्रत्येकाची आघाडी,
ठळक मुद्देश्रमदानासाठी सातत्याने प्रत्येकाची आघाडी, वडाचीवाडी या शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीच्या गावाची निवड ईजीएसच्या माध्यमातून रोजगारअन्यही गावांना या मोहिमेत प्राधान्यक्रमाने सहभागी करून घेण्याचे नियोजन