शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

मिठाई विक्रेत्यांकडेही सरकारने लक्ष द्यावे; गणेशोत्सवात केवळ ४० टक्केच व्यवसाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:51 AM

कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे.

कल्याण : कोरोनामुळे सर्वत्र उद्योग-व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यात मिठाई विक्रेत्यांनाही फार मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणांमध्ये केवळ ३५ ते ४० टक्के च व्यवसाय झाल्याने पुढे येणाऱ्या सणांना कसा प्रतिसाद मिळेल, याची चिंता मिठाई विक्रेत्यांना लागली आहे.

यासंदर्भात ‘लोकमत’ने कल्याणमधील सुप्रसिद्ध अनंत हलवाईचे संचालक व मिठाई-फरसाण असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य अनंत गवळी यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी कोरोनामुळे मिठाई विक्रेत्यांसमोर उद्भवलेली आव्हाने आणि व्यवसायात आलेली प्रतिकूलता, यावर भाष्य केले.

कोरोनामुळे चार ते पाच महिने मिठाईची दुकाने बंद होती. एकीकडे व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे मात्र भरमसाट वाढीव वीजबिले मिठाई विक्रेत्यांना आली आहेत. कोरोनाच्या काळात अन्य उद्योजकांना तसेच काही घटकांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली. परंतु, आमच्यासारख्या व्यावसायिकांकडे मात्र सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आम्हा मिठाई विक्रेत्यांना कोणी वाली नाही. आम्हीदेखील आजच्याघडीला कामगारांना रोजगार देतो आहोत, पण व्यवसायात नुकसान झाले असताना कोणतीही आर्थिक मदत अथवा सवलतीची कोणतीही योजना सरकारकडून जाहीर झालेली नाही, असे गवळी म्हणाले. गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सण आहे. परंतु, कोरोनामुळे या सणात फार कमी व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पुढील सणांबरोबरच दिवाळीची चिंता आम्हाला लागली आहे.

कोरोनामुळे गणेशोत्सवात गणेशदर्शनासाठी घरोघरी जाण्यावर नागरिकांना मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे मिठाई खरेदीवर परिणाम झाला आहे. तसेच पावसाचा फटकाही व्यवसायाला बसल्याचे गवळी म्हणाले. दरम्यान, अनलॉकमध्ये व्यवसाय सुरू झाले आहेत. यात पुढील काळात खाद्यप्रेमींसाठी ड्रायफ्रुट्सची फॅन्सी मिठाई आणण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. खवय्यांसाठी ही मेजवानी असेल, असे ते म्हणाले.‘मालमत्ताकर, वाढीव वीजबिलांमध्ये सवलत द्या’आम्ही विक्रेते प्रामाणिकपणे कर भरतो. कोरोनामुळे व्यवसाय तोट्यात असताना मालमत्ताकर तसेच वाढीव वीजबिलांमध्ये काही प्रमाणात का होईना सवलत मिळावी, एवढीच माफक अपेक्षा सरकारकडून असल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव