लोकमत न्यूज नेटवर्कठाणो: एकीकडे कोरोनाच्या आजारावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून करोडोरु पयांचा खर्च होत आहे. ठाण्यात गृहनिर्माण संस्थांनी क्लब हाऊस, समाज मंदिर हॉल कॉरंटाईनसाठी उपलब्ध करून देण्याबरोबर त्याचा खर्चही गृहनिर्माण सोसायटयांनी करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. रु ग्णालय किंवा महापालिकेची जबाबदारी असतांना हा खर्च सोसायटयांनी का सोसावा? असा सवाल ठाणे जिल्हा सहकारी हौंसिग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केला आहे.अलिकडेच महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी ठाण्यातील गृहनिर्माण संस्थांना एक पत्र दिले होते. त्याद्वारे क्लब हाऊस आणि विविधोपयोगी सभागृह हे कॉरंटाईन केअर सेंटर म्हणून घोषित केले. याबाबत राणे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अशा कामात शासनाला मदत करण्याला गृहनिर्माण संस्थांचा विरोध नाही. परंतू, कोविड केअर सेंटर अर्थात सीसीसी म्हणून घोषित केल्यानंतर त्याच्या पूर्ततेसाठीच्या अटी गृहनिर्माण संस्थांसाठी जाचक आहेत.ज्या गृहनिर्माण संस्था स्वेच्छेने या अटी मान्य करतील त्यालाही विरोध नाही. मात्र, आरोग्यविषयक प्रशिक्षित नसलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आणि संस्थांना स्वखर्चाने ही यंत्रणा उभारण्यास सांगणे हे चुकीचे आहे. कारण कोविड- 19 साठी शासनाच्या वतीने करोडो रु पये खर्च केले जात आहेत. मग हा भार गृहनिर्माण संस्थांवर टाकणे आयोग्य आहे. शिवाय, सहकार कायद्यालाही धरून नाही.या परिपत्रकातील सातव्या अटीमध्ये मात्र प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची व्यवस्था कोण? कशी करणार? त्याची जबाबदारी कोणाची ? याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही .आठव्या अटीनुसार कॉरंटाईन सेंटरमधून निघणारा कचरा बायो मेडिकल वेस्ट सेंटरमध्ये देणो बंधनकारक आहे. बायो मेडिकल वेस्ट सोसायटी मध्ये तयार होत नसल्यामुळे त्याची व्यवस्था सोसायटी कशी करणार आहे? ही व्यवस्था करण्याची जबाबदारी महानगरपालिका किंवारु ग्णालयांची आहे. नवव्या अटीनुसार सोसायटीतील डॉक्टर्सना रु ग्णाची देखभाल करावी लागेल. सोसायटीमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यास महानगरपालिकेकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त करून घेणो सोसायटीला बंधनकारक आहे. त्यासाठी लागणारे मानधन आण िइतर शुल्क,रु ग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी किंवा सोसायटीने भरायचे आहे. त्यांनी हा खर्च न भरल्यास असा खर्च सोसायटी भरू शकणार नाही, कारण अशा कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याची तरतूद गृहनिर्माण संस्थांच्या उपविधीत किंवा कायद्यातही नाही. त्यामुळे असा निधीही संस्थेकडे जमा नसल्यामुळे गृहनिर्माण संस्था असा खर्च करू शकणार नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे. दहाव्या अटीनुसार जेंबो आॅक्सिजन सिलेंडर व आॅक्सिजन पुरवठा करणारा मास्क ठेवणे सोसायटीला बंधनकारक आहे. गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी किंवा सभासद हे आरोग्यविषयक प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी नाहीत. त्यांच्या चुकीमुळे एखाद्या रु ग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास सोसायटीच्या पदाधिका-यांना जबाबदार धरले जाईल, त्यामुळे अशी आरोग्य विषयक कामे करण्याची जबाबदारी गृहनिर्माण संस्थांवर टाकू नये अशी मागणी राणो यांनी केली आहे.*आदेशाचे पालन न केल्यास कलम 188 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल होण्याची भीती पदाधिका:यांमध्ये आहे. यात आदेशाऐवजी स्वेच्छेने काम करण्याचे आवाहन केल्यास गृहनिर्माण संस्थांकडून सहकार्याचा हात पुढे केला जाईल, असा विश्वासही राणो यांनी व्यक्त केला आहे.सोसायट्यांकडून प्रस्ताव आल्यामुळेच हा निर्णय-महापालिका प्रशासनाचा खुलासादरम्यान, गृहनिर्माण सोसायटीमध्ये कोव्हीड केअर सेंटर उभारण्यासाठी काही गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकार्यांकडूनच प्रस्ताव आल्यामुळे आपण सोसायटीच्या क्लब हाऊस, मल्टीपर्पज हॉलमध्ये कोव्हीड केअर सेंटर निर्माण करण्याविषयीचा निर्णय घेतला होता. तथापि हा निर्णय बंधनकारक नसल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.कोरोना कोव्हीड 19 ची सौम्य लक्षणे असलेल्या आणि कसलाही त्रास नसलेल्या रूग्णांना आता महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याची आवश्कता नसून अशी सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रूग्णांना सोसायट्यांमध्ये उपलब्ध असलेल्या क्लब हाऊसमध्ये कॉरंटाईन करण्याचा आणि त्यासाठी सोसायट्यांमधील क्लब हाऊसेस कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचा निर्णय महापालिकेच्यावतीने घेण्यात आला होता. याबाबत काही सोसायटीच्या पदाधिकाºयांनी तसा प्रस्ताव महापालिकेस सादर केला होता. त्याअनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला होता. तथापि हा निर्णय गृहनिर्माण सोसायट्यांसाठी बंधनकारक नसल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शासनाकडून कोरोनावर करोडोंचा खर्च: मग सोसायटयांवर कोरंटाईन केंद्राच्या खर्चाचा भार कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:13 AM
ठाण्यात गृहनिर्माण संस्थांनी क्लब हाऊस, समाज मंदिर हॉल कॉरंटाईनसाठी उपलब्ध करून देण्याबरोबर त्याचा खर्चही गृहनिर्माण सोसायटयांनी करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. रु ग्णालय किंवा महापालिकेची जबाबदारी असतांना हा खर्च सोसायटयांनी का सोसावा? असा सवाल ठाणे जिल्हा सहकारी हौंसिग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी पालिका आयुक्तांना पत्राद्वारे केला आहे. तथापि, हा निर्णय बंधनकारक नसल्याचा खुलासा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे ठाणे जिल्हा सहकारी हौसिंग फेडरेशनचा सवालमहापालिका आयुक्तांना दिले पत्र