लोकमत न्यूज नेटवर्कठाणो : ठाणो महापालिकेच्या ग्लोबल हब येथील विशेष कोविड हॉस्पिटलमधील बेजबाबदार कारभाराची राज्यपाल भगतिसंग कोश्यारी यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात कडक कारवाईचे राज्य सरकारला निर्देश देण्याचे आश्वासन राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुवारी दिले.
ग्लोबल हब येथील रु ग्णालयात दाखल केलेले वृद्ध भालचंद्र गायकवाड बेपत्ता झाल्याचे रु ग्णालय व्यवस्थापनाने नातेवाईकांना सांगितले होते. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठविल्यानंतर, ठाणो भाजपानेही महापालिका आयुक्त तसेच कापूरबावडी पोलिसांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली होती. तसेच गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला होता. या संदर्भात राज्यपाल कोश्यारी यांची भाजपाचे ठाणो प्रभारी किरीट सोमय्या आणि आमदार, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी 9 जुलै रोजी मुंबईत राजभवन येथे भेट घेतली. या वेळी गायकवाड आणि सोनावणो कुटुंबियांनीही आपल्या भावना राज्यपालांकडे व्यक्त केल्या. या वेळी भाजपाचे महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक भरत चव्हाण, कृष्णा पाटील, भाजयुमोचे सारंग मेढेकर आदींचीही उपस्थिती होती.
ठाणो शहराला कोरोनाचा विळखा पडला असताना महापालिकेकडून विशेष सतर्कतेने रु ग्णांवर उपचार होण्याची गरज होती. मात्र, महापालिकेने कोटयवधी खर्चून उभारलेल्या विशेष कोरोना रु ग्णालयात गैरव्यवस्था असल्याकडे सोमय्या आणि डावखरे यांनी लक्ष वेधले. तसेच गायकवाड-सोनावणो कुटुंबियांच्या भावनांशी ठाणो महापालिकेने खेळ केला असल्याचे नमूद केले. यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी राज्यपालांनी दिले.
औषधांचा काळाबाजारकोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी असलेल्या रेमडेसिविर व टॉसिलिजुमैब औषधांचा मुंबई महापालिकेच्या काही कर्मचा:यांकडून काळाबाजार चालू असल्याप्रकरणी कारवाईची मागणी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली.
राजगृह हल्लाप्रकरणी निवेदनभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह वर केलेल्या हल्ल्याप्रकरणी कडक कारवाई करावीच्या मागणीचे निवेदनही आमदार डावखरे यांनी यावेळी राज्यपालांना दिले.