ठाणे : जिल्हा परिषदेची मुख्य इमारत गेल्या तीन वर्षांपासून धोकादायक घोषित करण्यात आली असून वागळे इस्टेट येथील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेली धोकादायक इमारतदेखील येत्या आठवडाभरात पाडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. या निवासी इमारतींमधील कर्मचाऱ्यांची आता अन्यत्र निवासव्यवस्था करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेची मुख्य इमारत रिकामी केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांसह अनेकांना सध्या आपल्या निवासस्थानांमधून कामकाज पाहावे लागत असताना आता कर्मचाºयांच्या डोक्यावरील छप्पर जाणार आहे. अर्थात, त्यांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली जात आहे.जिल्हा परिषदेच्या आवारातील मुख्य इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्या पावसाळ्यात रिकामी करण्यात आली. यातील कार्यालये जवळच्या दोन इमारतींसह आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये, बांधकाम विभागाच्या कॅम्पसमध्ये हलवण्यात आली. याशिवाय, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींची दालने पदाधिकाºयांच्या निवासस्थानांमध्येच सध्या सुरू आहेत. आता वागळे इस्टेट परिसरातील जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या निवासी इमारती पाडण्यास राज्य शासनाने अलीकडेच मंजुरी दिली. आता या इमारती पाडण्यासाठी खर्चास मंजुरी घेण्यासाठी हाचलाची सुरू आहेत.कार्यालयांसाठी भाड्याच्या जागेचा शोधइमारतींमधील कर्मचाºयांची निवासव्यवस्था अन्यत्र करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, नोटीस मिळालेली नसल्याचे काही कर्मचाºयांनी सांगितले. कार्यालयीन इमारत व निवासी इमारतीच्या दोन विंग पाडून तेथे कोट्यवधी रुपये खर्चाच्या नवीन इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातील सुस्थितीत असलेल्या पदाधिकारी निवास व प्रशासकीय इमारत यापाठोपाठ पाडण्याचे प्रयत्न आहेत. यापूर्वी या इमारती पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यानंतर अन्य इमारती पाडल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यालयांसाठी भाड्याच्या जागेचा शोध सुरू झाला आहे. चरई येथील एमटीएनएलच्या इमारतीमधील जागा भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेला अन्यत्र भाड्याने जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.
जि.प. अध्यक्षांपाठोपाठ आता कर्मचारीही होणार ‘बेघर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:02 AM