शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

जि. प. अधिकाऱ्यांनी एकही पैसा खर्च न करता अडवलं पाणी; 1500 वनराई बंधाऱ्यांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 12:27 AM

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला

ठाणे : जिल्ह्यात आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे १५०० वनराई बंधारे बांधल्याबद्दल व आगामी काळात उर्वरित ठिकाणी नदी, नाले, ओहोळ यावर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला आहे.जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाºयांची कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे, ग्रामपंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी पूर्ण केली.जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमदानातून वनराई बंधारे बांधत आहेत. ग्रामपंचायतींच्या सदस्यांनी व गावकºयांनी त्यात हिरिरीने सहभाग घेतला. जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याची लोकचळवळ सुरू झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाºयांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली. वनराई बंधारे उभारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे अधिकाºयांचे कौतुक होत आहे.गावखेड्यांतील पाणीटंचाई होणार दूर; रब्बी हंगामालाही लागणार हातभारवनराई बंधाºयांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे पीक घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय, विहिरीतील पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.जंगलातील माळरानावरील पशुपक्षी, गायी, म्हशी आदी जनावरांच्या पाण्यासाठी या बंधाºयांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणीटंचाई टाळण्याकरिता त्याचा उपयोग होणार आहे.वाहून जाणाºया पाण्याचा वनराई बंधाºयांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या गोण्या महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत.