शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

सदस्यांच्या विरोधानंतरही ‘कोलब्रो’वर कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 1:26 AM

मालमत्ता सर्वेक्षणासाठी वाढीव साडेतेरा कोटी देणार : स्थायी समितीने दिली बहुमताने मंजुरी

कल्याण : केडीएमसी हद्दीतील मालमत्ताकराची वसुली ९० टक्के व्हावी, यासाठी मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या कोलब्रो ग्रुप कंपनीला १३ कोटी ५० लाख वाढीव खर्च देण्याचा विषय गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी आला असता त्याला शिवसेनेच्या दोन सदस्यांनी विरोध केला. मात्र, त्याला न जुमानता सभेने मतदान घेऊन या विषयाला मंजुरी दिली आहे.

कोलब्रो कंपनीला अत्याधुनिक पद्धतीने मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम मार्च २०१६ मध्ये दिले गेले. एका मिळकतीच्या सर्वेक्षणासाठी ४०८ रुपये दर दिला गेला. तसेच अडीच लाख मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार, १० कोटी रुपये खर्चास मंजुरी दिली गेली. कंपनीला महापालिकेने सर्वेक्षणापोटी नऊ कोटी ८९ लाख ९५ हजार रुपये दिले आहेत. मात्र, कंपनीने जानेवारी २०१९ पर्यंत पाच लाख १४ हजार २७९ मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षण केलेल्या मालमत्तांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कंपनीला १३ कोटी ५० लाख रुपये वाढीव खर्च द्यायचा आहे. या प्रस्तावाला शिवसेना सदस्य गणेश कोट व गोरख जाधव यांनी विरोध केला.कोट म्हणाले की, ‘सर्वेक्षणात जास्त मालमत्ता आढळल्या असतानाही मालमत्ताकर वसुलीत वाढ का झाली नाही. मालमत्तांच्या सर्वेक्षणाबरोबर बेकायदा नळजोडण्या शोधणेही कंत्राटदाराचे काम होते. मात्र, कंपनीने ते केलेले नाही. तरीही, प्रस्ताव मंजुरीसाठी आणला आहे. त्याच्या गोषवाºयात बेकायदा नळजोडण्यांचा कुठेही उल्लेख नाही. केवळ मालमत्ता सर्वेक्षणाचा उल्लेख त्यात केला आहे. २७ गावे भविष्यात महापालिकेतून वगळली गेल्यास हा वाढीव खर्च वाया जाण्याची भीती आहे.’ जाधव म्हणाले, ‘बेकायदा नळजोडण्या ४०० असल्याचे कंपनी सांगत असली, तरी माझ्याच प्रभागात शोध घेतल्यास दोन हजार बेकायदा नळजोडण्या असू शकतात. कंपनी देत असलेली आकडेवारी फसवी आहे.’ दरम्यान, जाधव व कोट यांचा विरोध पाहता सभापती विकास म्हात्रे यांनी हा विषय मतदानासाठी घेतला. यावेळी कोट व जाधव वगळता सेनेच्या अन्य सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात आला.२७ गावांतील सर्वेक्षणाचे काम अपूर्ण२७ गावांतील ‘ई’ व ‘आय’ प्रभागांत मिळून ५९ हजार ८४ मिळकतींचे सर्वेक्षण ‘कोलब्रो’ने केले आहे. या सर्वेक्षणाला सर्वपक्षीय संघर्ष समिती व ग्रामस्थांचा विरोध होता. त्यामुळे काही काळ थांबवलेले सर्वेक्षणाचे काम आता पुन्हा सुरू केले आहे. मात्र, २७ गावांतील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.मालमत्ताकरात वाढप्रशासनाच्या मते, सर्वेक्षणाचे काम झाल्याने काही मालमत्तांना करआकारणी केली आहे. त्यामुळे मालमत्ताकराच्या वसुलीत वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये १८ कोटी ५५ लाख रुपये वाढ मिळाली आहे. मालमत्ताकर आकारणीतून प्रतिवर्षी १३ कोटी २६ लाख रुपये वाढीव कर मिळू शकतो, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.गावातून करवसुली कमी२७ गावे वगळण्यात येणार असल्याने वसुलीसाठी महापालिकेकडून किती दट्ट्या आला तरी, कर भरू नका, असे आवाहन नेते मंडळी तेथील ग्रामस्थांना करत आहेत. महापालिकेस २७ गावांतून चालू वर्षी व थकबाकीपोटी २८५ कोटी रुपये येणे बाकी आहे. वाढीव करवाढीस २७ गावांचा विरोध आहे. त्यामुळे गावांतून मालमत्ताकराची वसुली कमी आहे. गावे वगळल्यास या थकबाकीवर महापालिकेस पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. अन्यथा, सरकारने ही थकबाकीची रक्कम अनुदानापोटी महापालिकेस द्यावी, अशीही मागणी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :thaneठाणे