शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

खर्च ऑनलाइन नोंदवण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सापडले चक्रव्यूहात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 1:08 AM

Gram Panchayat News : ठाणे जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतींच्या १ हजार ४११ सदस्यांसाठी निवडप्रक्रिया पार पडली आहे. यासाठी रिंगणात असलेल्या २ हजार ४१३ सदस्यांनी नशीब आजमावले.

- सुरेश लोखंडे ठाणे -  जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायतींच्या १ हजार ४११ सदस्यांसाठी निवडप्रक्रिया पार पडली आहे. यासाठी रिंगणात असलेल्या २ हजार ४१३ सदस्यांनी नशीब आजमावले. उमेदवारांना त्यांच्या प्रचाराचा खर्च आता ऑनलाईन भरावा लागत आहे. मात्र, त्यांना यासाठी नेट कनेक्शनच्या रेंजच्या समस्येसह वेबसाइटही ओपन होत नाही. तर तांत्रिक अनुभव व मार्गदर्शनाची समस्याही  सतावत आहे.जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींसाठी ४७९ मतदान केंद्रांवर २ लाख ८१० मतदारांनी (८०.२३ टक्के) मतदान केले. यामध्ये १४ हजार ६०२ महिलांसह १ लाख ६ हजार २०८ पुरुष मतदार आहेत. उर्वरित आठ ग्रामपंचायतींचे सदस्य बिनविरोध निवडून आले आणि पाच ग्रामपंचायतींसाठी गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तेथे मतदानप्रक्रिया पार पडली नाही. मात्र, या निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना आता त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब ऑनलाईन द्यावा लागत आहे.  बहुतांश सदस्यांनी अद्यापही खर्चाची नोंद केली नसल्याचे दिसून येत आहे.काय अडचणी  येत आहेत?सदस्यांना मोबाइल वापरता येत असला तरी ऑनलाइन खर्चाची नोंद करण्याची सवय नसल्यामुळे समस्या येत आहे. याशिवाय त्यासाठी त्यांना आत्मविश्वास नसल्याने गंभीर चूक होण्याची भीती आहे. याशिवाय तांत्रिक समस्यांमध्ये नेटची समस्यासह मोबाइलला रेंज ग्रामीण व दुर्गम भागात मिळत नाही. खर्च ऑफलाइन भरला! निवडणूक विभागाने ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च ऑनलाइन भरण्यास सांगितला होता; परंतु ऑनलाइन वेबसाइट बंद असल्याकारणाने हा खर्च तहसीलदार कार्यालयात ऑफलाइन जमा केला आहे. याशिवाय मोबाइल रेंजही कमी, जास्त होत असल्याची समस्या ग्रामीण भागात आहे.-संचिता सचिन इसामे, सदस्य, ग्रा.पं. शिवळे, ता. मुरबाड ऑनलाइन खर्च नोंदवण्यासाठी मार्गदर्शनऑनलाइन उमेदवारी अर्ज व खर्च कसा नोंदवायचा याचे मार्गदर्शन उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना आधीच कार्यशाळेत दिले आहे. याशिवाय आताही व्हिडिओद्वारे मार्गदर्शन दिले जात आहे. या व्यतिरिक्त तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेत खर्च ऑनलाइन नोंदवण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. शासन दररोज नियम बदलत असल्याने निवडणुकीचा खर्च देण्यास अडचण येत आहे. कधी ऑनलाइन खर्च सादर करा, असे सांगितले जात आहे, तर कधी ऑफलाइन खर्चाचा हिशोब द्या, असे सांगितले जात आहे. ऑनलाइनची साइट सुरू होत नसल्याने वेळेत निवडणूक खर्च जमा करण्यास अडचण येत आहे. शेवटी निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी ऑफलाइन खर्च जमा करा, असे सांगितले आहे . - जयश्री अरुण ठाकरे, सदस्य, ग्रा.पं. नारीवली

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत