शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ग्रामीणमधील विद्यार्थी ‘आॅनलाइन’पासून दूर

By admin | Published: July 01, 2017 7:37 AM

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शहरी भागात आॅनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शहरी भागात आॅनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी व मुंबई उपनगरांतील महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्यासाठी बिर्ला कॉलेजमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरूकरण्यात आले होते. असे असतानाही काही अडचणींमुळे ग्रामीण भागातील जवळपास ४० टक्के विद्यार्थी योग्य प्रकारे आॅनलाइन प्रवेशअर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न तूर्तास तरी प्रलंबित राहणार आहे. त्यांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले. ग्रामीण भागासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया नाही. त्यामुळे मुंबई व शहरांतील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांकडून फॉर्म घेऊन व्हेरिफाय करायचे होते. मात्र, त्यांना त्याबाबत मार्गदर्शन मिळाले नव्हते. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन चौकशी करत होते. या विद्यार्थ्यांसाठी बिर्ला महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते. मार्गदर्शन व प्रवेशअर्ज भरणे, या दोन्ही प्रक्रिया होत्या. मात्र कोन, भिवंडी,शहापूर व मुरबाड, अन्य ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाही. आॅनलाइन प्रवेशाची तारीख १६ ते २९ जूनपर्यंत होती. प्रवेशाची मुदत संपल्यावर जवळपास ४० टक्के विद्यार्थी प्रवेश अर्ज आॅनलाइन प्रक्रियेद्वारे भरू शकले नाही. आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता दिलेल्या साइटचा सर्व्हर डाउन झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक दिवस पूर्णपणे बंद होती. परिणामी, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला.कल्याणच्या मुथा कॉलेजच्या प्राचार्या श्रुती वाईकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बिर्ला महाविद्यालयात प्रवेशाची सुविधा करण्यात आली होती. सीबीएसई व आयसीएसई या अभ्यासक्रमांतूून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश फॉर्म भरावे लागत नाहीत. विशेषकरून प्रवेश अर्जात बायफोकल व त्याला पर्याय एमटीडीसी हा विषय आॅनलाइनमध्ये नमूद केला होता. हा पर्याय बायफोकलसाठी असल्याचे अनेक पालक व विद्यार्थ्यांना ते समजले नाही. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरताना तेथे अनेकांनी ‘नो’ हा पर्याय निवडला. एमटीडीसी हा विषय दहावीसाठी असल्याने पालकांचा गोंधळ उडाला. हा पर्याय बायफोकलसाठी असल्याने तो न समजल्याने ६० ते ७० टक्के पालकांसह विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.