शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
3
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
6
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
7
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
8
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
9
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
10
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
11
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
12
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
14
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
15
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
16
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
17
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
18
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
19
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
20
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…

फुल्ल गर्दी... मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला फाटा, शिवसेना नेत्यांचा भव्य उद्घाटन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 6:24 PM

राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून ठाण्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. येथील रुग्णांचा आकडा 2 हजारांच्या पार गेल्याने पालिका प्रशासनाने काळजी घेण्याचे सूचवले आहे.

रणजीत इंगळे

ठाणे - राज्यात आणि विशेषत: मुंबईकर कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तर, प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करण्याचेही बजावले. मात्र, दुसरीकडे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाण्यात महापौरांनी या आवाहनाला फाटा देत भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. याठिकाणी कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. एकट्या मुंबईतील आकडा दैनिक 20 हजारांच्या पुढे गेल्याने चिंता वाढली असताना हा कार्यक्रम म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान... असेच शिवसेनेचं दिसून येत आहे. 

राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून ठाण्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. येथील रुग्णांचा आकडा 2 हजारांच्या पार गेल्याने पालिका प्रशासनाने काळजी घेण्याचे सूचवले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कठोर कारवाई केली जाते. मग, राजकीय कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न ठाणेकर जनतेतून विचारला जात आहे. ठाण्याचे प्रथम नागरिक महापौरच अशारितीने कोरोना नियमांचा फज्जा उडवत असतील तर कोरोना रुग्णसंख्या कशी कमी होईल? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

दरम्यान, ठाणे महापौरांना कोरोनाचे गांभीर्य कधी समजेल व नियम पाळण्याचे शहाणपण कधी सुचेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, एकीकडे कोरोनामुळे प्रशासनाकडूनच नियमावलींवर बोट ठेवण्यात येत असून दुसरीकडे महापौरांनाच गर्दीचे भान नसल्याचे दिसून येत आहे.  

टॅग्स :thaneठाणेShiv Senaशिवसेनाcorona virusकोरोना वायरस बातम्या