शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

अनुदान तर मंजूर; पण डीडीओ कधी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 4:21 AM

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या रुग्णालयाला राज्य सरकारने साहित्यखरेदीसाठी नुकतेच जवळपास ९ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे.

- राजू काळेभार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या रुग्णालयाला राज्य सरकारने साहित्यखरेदीसाठी नुकतेच जवळपास ९ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र, त्याचा हिशेब ठेवण्यासाठी अद्याप डीडीओचीच (डीडीओ ड्रॉइंग अ‍ॅण्ड डिसबर्सिंग आॅफिसर) नियुक्ती झाली नसल्याने अनुदान मंजुुरी केवळ सोपस्कार ठरल्याची चर्चा वैद्यकीय विभागात सुरू झाली आहे. या नियुक्तीअभावी रुग्णालयाचे सरकारी हस्तांतरण लांबणीवर पडत असल्याचीही चर्चा आहे.३० नोव्हेंबर २०१६ रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पालिकेच्या जोशी रुग्णालयाच्या हस्तांतरणास मान्यता देण्यात आली. त्यावेळी जिल्हा उपसंचालक (आरोग्य) यांच्या नियंत्रणाखाली रुग्णालय हस्तांतरणाची कार्यवाही सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सरकारने दिले. परंतु, पालिकेने रुग्णालय हस्तांतरणाच्या महत्त्वाच्या तांत्रिक बाबी पूर्ण न केल्याने हे हस्तांतरण रेंगाळले. दरम्यान, हस्तांतरणाच्या प्रारूप सामंजस्य कराराला राज्य सरकारची मान्यता न मिळाल्याने हस्तांतरणात खोडा निर्माण झाला. त्याला २०१६ मध्ये राज्य सरकारने मान्यता दिली. त्यानंतर, रुग्णालयासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हस्तांतरणात पदनिर्मितीचा अडसर निर्माण झाला. तत्पूर्वी पालिका आस्थापनेवरील सुमारे ३६ अधिकारी आणि कर्मचारी सरकारी सेवेत सामावून घेण्यात आले होते. मात्र, रुग्णालय चालवण्यासाठी शंभरहून अधिक मनुष्यबळ आवश्यक ठरणार असल्याने त्यांच्या पदनिर्मितीच्या मान्यतेत पुन्हा हस्तांतरण रेंगाळले. अखेर, १६ जानेवारीला राज्य सरकारअंतर्गत कोअर कमिटीतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या बैठकीत रुग्णालयातील एकूण ३६५ पदनिर्मितीला मान्यता देण्यात आली. तसेच रुग्णालयाच्या वार्षिक खर्चासाठी सुमारे २५ कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीलादेखील मान्यता मिळाली. यानंतर, रुग्णालयात कार्यरत ३६ पैकी ३५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घेण्याबाबत अंतिम निर्णयासह डीडीओच्या पदनिर्मितीलाही मंजुरी मिळाली. यामुळे हस्तांतरणाच्या सामंजस्य कराराला गती मिळून काही दिवसांतच राज्य सरकारमार्फत रुग्णालय चालवले जाणार असल्याचा मार्ग मोकळा झाला, असे मानले जात होते. मात्र, पदनिर्मिती करूनही डीडीओची अद्याप नियुक्तीच न झाल्याची बाब समोर आली. या हस्तांतरणात डीडीओचा तांत्रिक खोडा निर्माण झाला आहे.>पालिकेचे रुग्णालय राज्य सरकारकडे हस्तांतर होणार असल्याने त्यातील आर्थिक ताळेबंद पाहण्याची जबाबदारी डीडीओ यांची असते. त्याचा अधिकार रुग्णालय अधीक्षकांना दिला जातो. मात्र, तसा सरकारी आदेश काढणे अपेक्षित आहे. मात्र, तो अद्याप काढण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णालयाचे हस्तांतर तूर्तास लांबले आहे.- डॉ. प्रमोद पडवळ, प्रभारी मुख्य आरोग्य अधिकारी,मीरा-भार्इंदर पालिका